व्हॉटसपवर सध्या एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकार युजर्सच्या चॅटवर नजर ठेवून आहे. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की व्हॉटसपने यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहे. या व्हायरल मेसेजमध्ये तीन टीक्सबद्दल सांगण्यात आलं आहे आणि त्याचे अर्थही सांगण्यात आले आहेत. आता या मेसेजचं सत्य काय आहे, याबद्दल प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीकडून माहिती देण्यात आली आहे.
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मेसेजवर तीन टीक दिसणं म्हणजे त्या मेसेजेसवर लक्ष ठेवलं जात आहे. पीआयबीने सांगितलं की हा व्हायरल मेसेज खोटा आहे. व्हॉटसप किंवा कोणत्याही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मबद्दल अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नाहीत.
व्हॉटसप या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म संदर्भातला हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर सरकारकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजमध्ये यूजर्सला नव्या चेक मार्कबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यासोबत यूजर्स चेक करू शकतात की त्यांचा मेसेज सरकार पाहत आहे की नाही.
या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आला आहे?
या मेसेजमध्ये व्हॉटसपवरच्या विविध टिक्सचे अर्थ समजावून सांगण्यात आले आहेत. सिंगल चेक आणि टिकचा अर्थ आहे की मेसेज व्यवस्थित गेला आहे. डबल टिकचा अर्थ आहे की मेसेज डिलिव्हर झाला आहे. तर ब्लू टिकचा अर्थ आहे की तो मेसेज वाचला गेला आहे. हे फिचर सध्या व्हॉटसपमध्ये उपलब्ध आहे.
मात्र या व्हायरल मेसेजमध्ये तीन ब्लू टिकचा उल्लेख करण्यात आला आहे. तीन ब्लू टिक याचा अर्थ सरकार तुमचे चॅट्स वाचत आहे. दोन ब्लू आणि एका लाल टिकचा अर्थ आहे की युजरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. एक ब्लू आणि दोन लाल टिकचा अर्थ आहे की सरकार युजरचा डेटा तपासत आहे. तीन लाल टिकचा अर्थ आहे की आता युजरच्या विरोधात कारवाई करण्यात येईल आणि लवकरच कायदेशीर कारवाईही होईल.
व्हायरल मेसेजमधला हा दावा साफ खोटा...
PIB ने हा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं आहे. सरकारने चॅट्सच्या संदर्भात अशा पद्धतीच्या कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाही. हा मेसेज गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समोर आला होता. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अॅपमध्ये End - to - End encrypted सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सेंडर आणि रिसिव्हर यांच्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्ती मेसेज वाचू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.