हुंडाबंदीचा कायदा असूनही अजूनही हुंड्याची पद्धत सुरु असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत, ही कुप्रथा वर्षानुवर्षे चालू आहे. हुंडा घेणे हा गुन्हा असला तरी अनेक ठिकाणी ही प्रथा आजही गुपचूप सुरु आहे. लग्नात अनेकदा वरपक्षाकडून हुंडा मागितला जातो, पण हुंड्याच्या बाबतीत वेगळेच प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील या प्रकरणात सासरच्या मंडळीने जबरदस्तीने हुंडा दिल्याचा आरोप नवरदेवाने केला आहे.