Viral Video: हृदयस्पर्शी प्रसंग...बर्फवृष्टी सुरु असताना नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम माणसासाठी शीख युवक बनला 'छत'

Viral Video: जम्मू-काश्मीरच्या विविध भागात तीन-चार दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. गुरुवारी रात्री काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली.
Viral Video
Viral Video
Updated on

Viral Video: जम्मू-काश्मीरच्या विविध भागात तीन-चार दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. गुरुवारी रात्री काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी जम्मू-काश्मीरसह राज्यातील पर्वत आणि काही मैदानी भागात हिमवर्षाव आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर दक्षिण काश्मीरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते. 

विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. यामुळे लोकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहेत. अशातच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. जम्मू -काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरील हा व्हिडीओ आहे. (video viral News in Marathi)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम माणूस रस्त्याच्या कडेला नमाज अदा करत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी देखील सुरु होती. यावेळी एका शिख माणसाने मानवतेचा धर्म निभावला आहे. त्याने छत्रीचा वापर करून नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम माणसाला बर्फवृष्टीपासून वाचवले आहे.

Viral Video
Sanjay Leela Bhansali Movie : संजय लीला भन्साळींचा 'तो' मास्टरपीस आता 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित!

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच आहे. उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस जोरदार बर्फवृष्टी होईल. त्याचवेळी हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे 6 राष्ट्रीय महामार्गांसह 566 रस्ते बंद करण्यात आले आहेत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून लाहौल स्पितीमध्ये शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

Viral Video
Arvind Kejriwal: सर्व काही दिल्लीसाठी...? केजरीवालांनी ईडीचं 5 वेळा समन्स धुडकावलं, आता भाजपने ऑफर दिल्याचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.