'शाहबाजनं मला थांबवून लग्न करण्यास सांगितलं. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यानं मला दिली.'
मध्य प्रदेशातील खंडवा (Madhya Pradesh Khandwa) इथं हिंदू संघटनेच्या (Hindu Organization) काही लोकांनी एका मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
यानंतर मुस्लिम संघटनांनी (Muslim Organization) याला मॉब लिंचिंगची (Mob lynching) घटना म्हणत संताप व्यक्त केलाय. सध्या पोलीस गुन्हा दाखल करून आरोपींची ओळख पटवत आहेत. हे प्रकरण खंडवा येथील आहे. हिंदू संघटनेच्या काही लोकांनी शाहबाज नावाच्या तरुणाला पकडलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सायबर कॅफेमध्ये (Cyber Cafe) तो तरुणीचा विनयभंग करत होता. यानंतर हिंदू संघटनेच्या लोकांनी त्या तरुणावर हिंदू मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला. पीडित मुलीनं पोलीस ठाण्यात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तरुणीनं पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि सांगितलं की, 'मी सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरण्यासाठी गेली होती. यादरम्यान शाहबाजनं मला थांबवून लग्न करण्यास सांगितलं. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यानं मला दिली.' यावेळी पोलीस ठाण्यात पीडित मुलीसोबत डॉ. अनिश आरझारे, माधव झा, रवी कुमायू, अनिमेश जोशी, आदित्य मेहता आणि हिंदू जागरण मंचचे हंसराज बाथम आदी उपस्थित होते.
काझी सय्यद निसार अली सांगतात, 'एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सिहाडाच्या विद्यार्थ्याच्या विरोधात कट रचण्यात आला आहे. त्याला एका मॉलच्या पार्किंगमध्ये नेऊन काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये अपहरण आणि मॉब लिंचिंगची कलमं लावण्याची मागणीही पोलिस अधीक्षकांकडं करण्यात आलीये. तसंच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.'
या प्रकरणी पोलिस अधीक्षक विवेक सिंह म्हणाले, 'व्हायरल व्हिडिओमध्ये 5-6 लोक एका तरुणाला मारहाण करत आहेत. आम्ही तरुणाच्या तक्रारीवरून आधीच गुन्हा दाखल केला होता. त्यादरम्यान पीडित तरुणीची ओळख पटत नव्हती. सध्या अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.