Valentine Day विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; कुत्र्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून लावून दिलं लग्न

भारतातील अनेक भागात लोक आज म्हणजेच, 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत आहेत, तर काही लोक याला विरोध करत आहेत.
Valentine's Day Special
Valentine's Day Special esakal
Updated on
Summary

आज 14 फेब्रुवारीला जगातील बहुतेक देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवशी प्रेमी एकमेकांना भेटतात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि एकत्र वेळ घालवतात.

Valentine's Day Special : भारतातील अनेक भागात लोक आज म्हणजेच, 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत आहेत, तर काही लोक याला विरोध करत आहेत.

तमिळनाडूतील शिवगंगा (Sivaganga in Tamil Nadu) भागात व्हॅलेंटाइन डे विरोधात वेगळ्याच प्रकारचा निषेध पाहायला मिळाला. या दिवशी हिंदुत्ववादी संघटनेनं दोन कुत्र्यांचं लग्न लावून दिलं.

हिंदू मुन्नानी संघटनेच्या (Hindu Munnani Sangathan) म्हणण्यानुसार, 'हा व्हॅलेंटाइन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात साजरा केला जाणारा उत्सव आहे.' या संघटनेचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत.

Valentine's Day Special
Sangli News: पोटचा मुलगा दिला भावाला अन् भावाच्या लेकीला घेतलं 'दत्तक'; ऐतिहासिक निर्णयाचं सर्वत्र कौतुक

कुत्र्याच्या गळ्यात मंगळसूत्र

सोमवारी हिंदू मुन्नानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन कुत्री (Dog) आणली. त्यांच्या अंगावर वस्त्र परिधान करुन गळ्यात फुलांचा हार घातला. यानंतर त्यांचं लग्न लावून दिलं. शिवाय, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून लग्न झाल्याचं प्रतीकात्मकपणे दाखवून दिलं.

Valentine's Day Special
Amit Shah : लोकसभा निवडणुकीबाबत अमित शहांचं मोठं भाष्य; म्हणाले, भाजपसाठी कोणतंच आव्हान..

भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर कोणतंही बंधन नाही

हिंदू मुन्नानी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, 'या दिवशी प्रेमीयुगुल सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करतात. त्यामुळं याच्या निषेधार्थ आम्ही कुत्र्यांचं लग्न लावून दिलं.' आज 14 फेब्रुवारीला जगातील बहुतेक देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवशी प्रेमी एकमेकांना भेटतात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि एकत्र वेळ घालवतात. काही लोकांचा याला विरोध असला तरी, भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर कोणतंही बंधन नाही. याविरुद्ध कोणताही कायदा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.