Worli Spa Murder Inside Story: गजनी स्टाईल शरिरावर कोरली 22 शत्रूंची नावं, 21 वर्षाची गर्लफ्रेंड अन् 52 वर्षीय चुलबुल पांडेची हत्या..

Guru Waghmare Murder Case: मंगळवार-बुधवारच्या रात्री मुंबईतील वरळी येथील स्पामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. सिद्धप्पा वाघमारेचा खून पोलिस तपासात उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता ते चक्रावून गेले.
 Former Police Informer Guru Waghmare Death Worli Spa Murder Case Inside Story
Former Police Informer Guru Waghmare Death Worli Spa Murder Case Inside Story
Updated on

वरळीतील एका स्पामध्ये 52 वर्षीय गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. याप्रकरणी पोलिस चौकशी करत असून धक्कादायक बाब म्हणजे, बॉलीवूड चित्रपट गजनीस्टाईलमध्ये गुरु वाघमारे यांनी त्यांच्या शत्रूंची नावे त्यांच्या शारिरावर गोंदवली होती. पोलिसांना हिस्ट्री शीटर सिद्धाप्पा वाघमारे यांच्या अंगावर २२ नावे आढळून आली आहेत. या नावांच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ( History Sheeter Guru Waghmare Death Worli Spa Murder Case Inside Story)

याप्रकरणी हिस्ट्री शीटर वाघमारेच्या 21 वर्षिय गर्लफ्रेंडचाही तपास सुरु आहे. हिस्ट्रीशीटरने सायनच्या हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर त्याची स्पामध्ये हत्या करण्यात आली.

मृत वाघमारेनं मांड्यांवर 22 शत्रूंची नावं टॅटूत कोरली

मंगळवार-बुधवारच्या रात्री मुंबईतील वरळी येथील स्पामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. सिद्धप्पा वाघमारेचा खून पोलिस तपासात उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता ते चक्रावून गेले.

कारण, सिद्धप्पा वाघमारेच्या मांडीवर 22 जणांची नावे लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या शत्रूंची नावे लिहिली होती. वाघमारे यांच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी हिस्ट्रीशीटरच्या मांडीवर लिहिलेल्या नावांचा तपास सुरू केला असून एकूण पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये स्पा मालकासह कोट, राजस्थान येथील अन्य तीन लोकांचा समावेश आहे. एकेकाळी वाघमारे पोलिसांचा खबरी होता.

गर्लफ्रेंडने मागितली होती पार्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये दररोज जात असे. वाघमारे मंगळवारी सायंकाळी स्पामध्ये गेला असता त्याच्या २१ वर्षीय गर्लफ्रेंडने पार्टी करण्याची मागणी केली. यानंतर पाच जणांचा ग्रुप सायनमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता.

पार्टीच्याच रात्री झाला खून

पार्टी झाल्यानंतर पाच जणांचा ग्रुप पुन्हा स्पामध्ये आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपैकी तिघे थोड्या वेळात येतो असे सांगून गुरू आणि २१ वर्षीय तरुणीला स्पामध्ये सोडून तेथून निघून गेले. ते तिघे बाहेर पडल्यानंतर १० मिनिटांनी दोन अनोळखी व्यक्ती स्पामध्ये आल्या आणि त्यांनी गुरूवर धारधार शस्त्रांनी वार करून पळ काढला. त्या हल्ल्यात गुरूचा मृत्यू झाला.वरळी पोलिसांनी स्पा मालकाला अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील मोहम्मद फिरोज अन्सारी (२६) आणि राजस्थानमधील कोटा येथील साकिब अन्सारी या दोघांना अन्य दोन संशयितांसह अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली होती. स्पा मालकाने वाघमारेच्या हत्येचे कंत्राट आरोपींना दिले होते असही पोलिसांनी यावेळी सांगितलं.

वाघमारेने 2010 पासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमधील स्पा मालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे आणि त्याच्यावर खंडणी, बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, असेही एका पोलिस अधिकाऱ्यांने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.