Air Cooler : देसी जुगाड! फक्त 500 रुपयांमध्ये असा बनवा घरच्या घरी कूलर

एका व्यक्तीने देसी जुगाड करत प्लास्टिक ड्रमपासून कुलर बनविला आहे.
Air Cooler
Air Coolersakal
Updated on

How To Make Air Cooler : उन्हाळा आला की सगळीकडे खूप तापतं. अशात कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण घरी महागडे एसी, कुलर विकत घेतो पण आता तुम्हाला कुलर वैगरे विकत घेण्याची काहीही गरज नाही. तुम्ही घरीच कुलर बनवू शकता.

तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? हो, हे खरंय. एका व्यक्तीने देसी जुगाड करत प्लास्टिक ड्रमपासून कुलर बनविला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (How To Make Air Cooler At Home video goes viral )

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क प्लास्टीक ड्रमपासून कुलर बनविताना दिसत आहे. हा व्हिडीओ एकदा सुरू केल्यानंतर तुम्हाला बंद करावासा वाटणार नाही. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एका साधारण प्लास्टिक ड्रमपासून कुलर बनविण्यात आलाय.

Air Cooler
Uorfi Javed Video: घर, बंदूक आणि उर्फी! आता तर काही खरं नाही...व्हिडिओ व्हायरल

सुरवातीला या व्यक्तीने प्लास्टिक ड्रमची कटींग केली. त्यानंतर समोरच्या साईडला फॅन लावण्यासाठी फॅनच्या फ्रेम साईजची कटींग करण्यात आली. त्यानंतर त्याने वरुन जाळी आणि फ्रेम लावली आणि आतून फॅन लावला.

त्यानंतर त्याने जाळी लावत कुलिंग पॅडही फिक्स केले. त्यानंतर या व्यक्तीने वॉटर पम्स आणि दोन मीटर वॉटर पाईप घेतलाय आणि या ड्रममध्ये फिक्स केलाय. त्यानंतर या व्यक्तीने ड्रमला दोन स्वीच सुद्धा लावले आणि आतून कनेक्शन जोडले. अशाप्रकारे या व्यक्तीने काही वेळातच कुलर बनविला. हा संपूर्ण व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Air Cooler
Viral Video : चिमुकलीचं सुमधूर गायन, वादन ऐकून भारावून जाल; PM मोदींनीही शेअर केला व्हिडिओ

सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा असून MR HK Experiment नी हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केलाय. या व्हिडीओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज आले असून लाखो लाईक्स आले आहेत. या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. त्याच्या जुगाडू वृत्तीचं कौतुक केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.