Hummer H1 X3 : कार नव्हे, हाहाकार! साध्या गाड्यांसमोर 'मॉन्स्टर' दिसतेय ही दुबईच्या शेखची गाडी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Dubai Sheikh Hummer Car : खास बनवून घेतल्यामुळे जगातील ही एकमेव मोठी हमर कार आहे.
Hummer H1 X3
Hummer H1 X3eSakal
Updated on

हमर या कंपनीच्या गाड्या सामान्य कारच्या तुलनेत भरपूर मोठ्या असतात. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीकडेही हमर कंपनीची गाडी आहे. मात्र, दुबईच्या एका शेखकडे असलेली हमर गाडी एवढी मोठी आहे, की त्यासमोर बाकी गाड्या अगदीच छोट्या दिसतात.

हमर कंपनीने तयार केलेल्या H1 कारचं X3 हे मॉडेल आकाराने अगदीच भव्य आहे. ही गाडी रस्त्यावरुन जात असताना फॉर्च्युनर-स्कॉर्पिओ अशा मोठ्या गाड्याही याच्यासमोर खेळण्यातील गाड्या वाटतात. दुबईचे अब्जाधीश शेख हमद बिन हमदान अल नाह्यान यांची ही गाडी आहे.

Hummer H1 X3
Mukesh Ambani New Car: बॉम्ब असूद्या की आग, काहीच फरक पडणार नाही! अंबानींनी घेतली नवी मर्सिडिज

या गाडीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये ही कार रस्त्यावर उभारलेली दिसतेय. कारच्या शेजारी काही माणसं उभी आहेत. या माणसांपेक्षाही मोठी या कारची चाकं आहेत. यावरुनच या गाडीच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो. (Hummer X3 Viral Video)

Hummer कंपनीची H1 नावाची एक कार आहे. याच कारचं हे तीनपट मोठं व्हर्जन असल्यामुळे याला Hummer H1 X3 असं नाव दिलं आहे. ही गाडी 46 फूट लांब, 21.6 फूट उंच, आणि 19 फूट रुंद आहे. शेख हमद यांच्या ऑर्डरवरुन ही खास बनवण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही जगातील एकमेव गाडी आहे.

Hummer H1 X3
Luxury Cars Collection : रोल्स रॉयस ते मर्सिडीज, अक्षय कुमारच्या गॅरेजमधलं शानदार कलेक्शन बघितलंत?

शेख हमद यांना 'दुबईचे रेन्बो शेख' म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या ताफ्यामध्ये कित्येक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 4x4 प्रकारातील एकूण 718 गाड्या आहेत. अशा प्रकारच्या गाड्यांचं सर्वात मोठं कलेक्शन केल्यामुळे त्यांची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.