MPSC Exam : नवरा बायको झाले क्लासवन अधिकारी! दररोज...

पती-पत्नीची कमाल, MPSC उत्तीर्ण होऊन एकाच वेळी बनले क्लास अधिकारी
MPSC Exam
MPSC ExamEsakal
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. राज्यातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर अनेक प्रेरणादायी घटना समोर येतात. गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातून अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली होती. संसाराच्या वाटेवर सोबत चालणाऱ्या पती पत्नीने स्पर्धा परीक्षेत भरारी घेतली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीमध्ये या दाम्पत्याचे नाव एकाचवेळी झळकल्याचे दिसून आले. सुरेश चासकर व मेघना चासकर, अशी या उत्तीर्ण यशस्वी झालेल्या अधिकारी पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत दोघांची वर्ग 1 पदी निवड झाली आहे.

MPSC Exam
Odisha : मोठी बातमी! आरोग्य मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला; भरसभेत झाडल्या अज्ञाताने गोळ्या, प्रकृती गंभीर

सुरेश आणि मेघना हे दोघे मे 2022 मध्ये विवाहबंधनात अडकले. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव हे आहे. नोकरी आणि घर सांभाळून या दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाल्याचे दोघांनी म्हटले आहे.

कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मेघना यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदवी काळातच स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू ठेवली होती.

MPSC Exam
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी अमित ठाकरेंना दिली खास भेट; चर्चेला उधाण

वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग उत्तीर्ण होण्याची किमया दोघांनी साधली आहे. लग्नानंतरही दोघे पुन्हा परीक्षेला सामोरे गेले आणि अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पद मिळवलं आहे. एकाचवेळी मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरतून कौतुक होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.