Viral Video : बायकोचं प्रमोशन झालं! नवऱ्याने ढोलताशांच्या गजरात फटाके फोडून केलं स्वागत

Viral Video
Viral VideoSakal
Updated on

हैद्राबाद : बायकोने आपलं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर प्रमोशन झाल्याने नवऱ्याने तिचं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून स्वागत केलं आहे. ही घटना हैद्राबाद येथे घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कंपा दीना असं या महिलेचं नाव असून तिचं कॉन्स्टेबल पदावरून हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झालं आहे.

दरम्यान, कंपी दीना आणि तिचा नवरा रोनल बसिल हे दाम्पत्य इरागड्डा या भागातील प्रेमनगर येथे वास्तव्यास आहेत. दीना ही तेलंगणा पोलीस खात्यात नोकरीला आहे. तिने नुकतीच आपली ४५ दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली आहे. तिची कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे. तिने आपल्या १८ महिन्यांच्या, जे अजूनही स्तनपान करते अशा बाळाला घरी सोडून ही ट्रेनिंग पूर्ण केली आहे.

Viral Video
Ladakh Video : उत्तर भारतात ढगफुटी, लडाखमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, लवकरच रस्ते खुले होणार

संजीवा रेड्डी नगर येथील पोलीस स्टेशन येथे दीनाची बदली करण्यात आली आहे. रोनल बसील हा सिव्हील इंजिनिअर आहे. पत्नीच्या प्रमोशनमुळे रोनलने हा उत्साह साजरा केला आहे. ढोलताशांच्या गरजामध्ये फटाके फोडून तिचे स्वागत केल्यानंतर केक कापण्यात आला. तर डान्स करत हा उत्साह साजरा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.