Video Viral : हॉटेल कामगारांना हॉकी स्टीकने मारहाण करणे महागात; IAS, IPS अधिकारी निलंबित

दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

अजमेर : राजस्थानातील अजमेर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी एक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. पोलिसांच्या समोरच 12 जून रोजी अधिकाऱ्यांनी या कामगारांना मारहाण केली असल्याचा आरोप कामगारांनी केला. त्यानुसार या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Viral Video
Viral Video : याला म्हणतात 36 गुण जुळणे! भोजपुरी गाणं अन् नवरदेव नवरीच्या डान्सने वऱ्हाडी दंग

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये काही कामगार धावत असून त्यांच्या पाठीमागून आलेले अधिकारी त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अधिक माहितीनुसार, मकराना राज हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी IAS अधिकारी गिरधर बेनीवाल आणि IPS अधिकारी सुशील कुमार बिश्नोई यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. हे दोघेही 2019 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या गिरधर हे अजमेर विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून काम करत होते तर बिश्नोई हे गंगापूर शहर पोलिसांत अधिकारी होते.

याप्रकरणी एएसआय रूपा राम आणि गेगल पोलिस स्टेशनचे हवालदार मुकेश यादव यांनाही निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी हॉटेलचे मालक नारायण सिंग यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.