Sick Leave: "तुम्हाला सीक लिव्ह घ्यायची असेल तर 7 दिवस आधीच सांगावं लागेल!" काय आहे हा प्रकार जाणून घ्या

Seven Day Prior Update To Take Sick Leave Viral News On Social Media: पुढच्या सात दिवसांनंतर तुम्ही आजारी पडणार आहात, असं तुम्हाला कधी जाणवतं का? किंवा तसं तुम्हाला ठामपणे सांगता येईल का?
Sick Leave
Sick LeaveeSakal
Updated on

नवी दिल्ली : पुढच्या सात दिवसांनंतर तुम्ही आजारी पडणार आहात, असं तुम्हाला कधी जाणवतं का? सर्दी-पडसं, पोटदुखी किंवा तापानं तुम्ही फणफणाल असं काही तुम्हाला ठामपणे सांगता येईल का? याचं उत्तर खरंतर नाही असंच असेल. पण एका भारतीय कंपनीत असा नियम आहे. या नियमानुसार, तिथल्या कर्मचाऱ्यानं सात दिवस आधीच सीक लिव्ह टाकल्याचं आणि या संदर्भातील चर्चेचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या स्क्रीनशॉटवरून असं दिसून येतं की या कंपनीतील कर्मचाऱ्यानं आजारी असल्याची सूचना केली आणि 'माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळं मी ऑफिसला येणार नाही' असं सांगून एक दिवसासाठी सीक लिव्ह देण्याची विनंती केली. यावर एचआर मॅनेजरनं संबंधित कर्मचारी खरंच सुट्टी घेतोय का याची खात्री केली, याला कर्मचाऱ्यानं संमती दिल्यानंतर. त्यानंतर व्यवस्थापकानं त्याला सांगितले की, 'सीक लिव्ह' किंवा 'कॅज्युअल लीव्ह' घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 7 दिवस अगोदर कळवणं आवश्यक आहे. दरम्यान, या चर्चेमध्ये कर्मचाऱ्यानं मॅनेजरला प्रतिप्रश्न केला की, पुढील ७ दिवसांत मी आजारी पडणार आहे हे मला कसं काय कळू शकतं?

Sick Leave
Crocodile in BKC: बीकेसीत मगर आढळल्यानं खळबळ! नागरिकांना वन विभागानं केलं महत्वाचं आवाहन

सीकलिव्ह बाबतचा हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरनं म्हटलं की, "त्या मॅनेजरला विचारा की तो पुढच्या ७ दिवसांत आजारी पडणार आहे का?"

दुसरा एक युजर म्हणाला की, "दररोज मॅनेजरला एक ईमेल पाठवा आणि मी आत्तापासून सात दिवस आजारी पडू शकतो असं त्यात लिहा. त्यामुळं तुम्हाला संपूर्ण आठवडा आजारपणात आराम करता येईल.

Sick Leave
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात! वित्त विभागाला खर्चाबाबत भेडसावतेय चिंता

तर तिसऱ्या एका युजरना वैयक्तिक अनुभव सांगताना म्हटलं की, “मी सुपरमार्केटमध्ये काम करायचो. एकदा माझी संध्याकाळची शिफ्ट असताना दुपारी काही कारणांमुळं मी पायऱ्यांवरून खाली पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली यात मला किरकोळ जखम झाली. यानंतर मी सुपरमार्केटमध्ये तसं कळवलं. तर मला त्यांनी सांगितलं की, मला तरीही कामावर यावं लागेल. कारण असं अचानक कळवायचं नाही तर सकाळी ८ वाजण्यापूर्वीच ते कळवणं गरजेचं आहे. त्यावर त्यांना सांगितलं की, मी यापुढे पायऱ्यांवरून खाली पडण्याचं वेळापत्रक तयार करेन.

तर आणखी एका युजरनं या विषयाची अत्यंत सफाईदारपणे चिरफाड करत सांगितलं की, तुम्ही जर एखाद्या दिवशी आजारी पडणार आहात असं सांगितलं तर ते तुम्हाला म्हणतील की तुम्ही खोटं बोलत आहात. कारण आजारी पडणार असल्याचं तुम्हाला कसं काय कळलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com