VIDEO : माजी पंतप्रधानांना अटक होताच समर्थकांनी लुटलं लष्कर अधिकाऱ्याचं घर; मोर, कोंबड्या नेल्या चोरुन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरु आहेत.
Pakistan ex pm imran khan arrested updates
Pakistan ex pm imran khan arrested updatessakal
Updated on
Summary

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) कार्यकर्त्यानं हातात मोर धरलेला दिसत आहे.

Imran Khan Arrest : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरु आहेत. त्यांच्या सुटकेची मागणी करत पीटीआय प्रमुखाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, अनेक आंदोलक शांततेत निदर्शनं करत असताना काहींनी हिंसाचार आणि लुटमारीचा अवलंब केला आहे. लाहोरमध्ये इम्रान खान यांच्या काही समर्थकांनी कॉर्प्स कमांडरच्या घरात प्रवेश करत तेथून मोर आणि स्ट्रॉबेरीसह अनेक वस्तू चोरल्या आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) कार्यकर्त्यानं हातात मोर धरलेला दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांनी दोन पांढरे मोर धरलेले दिसताहेत, जे त्यांनी लष्कराच्या कॉर्प्स कमांडरच्या घरातून चोरल्याचा आरोप आहे.

Pakistan ex pm imran khan arrested updates
Shiv Sena Case : सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

एवढंच नाही, तर पीटीआय कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांसह कोकाकोलाच्या बाटल्याही चोरल्या आहेत. एकानं सांगितलं की, 'तो त्याच्या मांजरीला आणि कुत्र्यांना हे डिश खायला देणार आहे.' टोमॅटो केचप, सॅलड, दही आणि कोंबडीही आंदोलकांनी चोरुन नेली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेला स्वयंपाकघरातून हे सर्व सामान मिळाल्याचं सांगितलं.

खान यांच्या समर्थकांनी एका कमांडरच्या घराची लाठ्या-काठ्यांनी तोडफोडही केलीये. निदर्शनामुळं देशभरात कलम 144 लागू करण्यात आलं असून सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

खानला अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या अनेक एफआयआरमध्ये जामीन मिळवण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. खान आणि इतर आरोपींनी ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीनं सरकारला पाठवलेल्या 50 अब्ज रुपयांची फेरबदल केल्याचा आरोप आहे.

खान यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या सुटकेची मागणी करत मोठ्या संख्येनं समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जिओ न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराची, गुजरांवाला, फैसलाबाद, मुलतान, पेशावर आणि मर्दानसह देशभरातील शहरांमध्ये पीटीआय कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तर, खान यांच्या काही समर्थकांनी हिंसाचार आणि लूटमारीचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()