डेअरिंग लागते! पठ्ठ्याने 'मगरी'ला कचरापेटीत भरले अन्... video viral

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय. फ्लोरिडा येथील एका घरा जवळ मगर शिरली आणि तिला पकडण्यासाठी पठ्ठ्याने एवढी भारी शक्कल लढवली की सारे चक्रावले.
Alligator florida
Alligator florida esakal
Updated on

Alligator Capture garbage can Video Viral: सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ पुन्हा धुमाकूळ घालतोय. एका मगरीला पकडण्यासाठी पठ्ठ्याने चक्क कचरापेटीचा वापर केल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. यापूर्वी या व्हिडीओला ३३ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते आणि तो आता पुन्हा व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील हा व्हिडीओ आहे. सेंट्रल फ्लोरिडाच्या स्थानिक टेलेव्हिजनने WESH2 न्यूजने २०२१ मध्ये हा व्हिडीओ पब्लिश केला होता.

२६ वर्षीय इयूजेन बोज्जी या तरुणाने हा पराक्रम केला. त्याच्या घराजवळ मगर आली आणि तिला पकडण्यासाठी पठ्ठ्याने कचरापेटी वापरली. त्याने कचरापेटी त्या मगरीच्या तोंडाजवळ आडवी पाडली आणि त्यानंतर ती मगरीकडे सरकवत राहिला. मगरीसमोर कोणताच पर्याय त्याने ठेवला नाही आणि तिला कचरापेटीत जावे लागले. ती आतमध्ये शिरताच बोज्जीने कचरापेटीचं झाकण बंद केलं.

त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून बोज्जीचे कौतुक केले. कचरापेटी घेऊन तो नजीकच्या तलावाजवळ गेला आणि तिथे जाऊन कचरापेटी आडवी पाडली. मगरीने झटकन स्वतःची सुटका करून घेतली आणि ती पाण्यात निघून गेली.

२०२१ मध्ये या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूएसए टुडेशी बोलताना बोज्जीने सांगितले होते की, त्याच्या मुलांनी त्याला मगरीबद्दल सावध केले होते. पण, ती इतकी मोठी असेल, याची त्याला जाणीव नव्हती. त्याची मुले व शेजारची मुले घराबाहेर खेळत होती आणि त्यांना वाचवण्यासाठी त्या मगरीला बाहेर काढावे लागेल, हे बोज्जीने ठरवले.

"ती मगर काहीतरी खाणं शोधण्यासाठी तिथे आली असावी, तिला भूक लागली असावी. पण, माझ्या मुलांचे आणि बाहेरील इतर मुलांचे संरक्षण करणे, ही एकच गोष्ट तेव्हा माझ्या मनात आली,''असे त्याने ने यूएसए टुडेला सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.