ऐ वतन तेरे लिए... जीव धोक्यात घालून जवानांनी बांधला 150 फूट लांब झुलता पूल...VIDEO पाहून वाटेल अभिमान

Indian Army engineers of Trishakti Corps: भारतीय सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉप्सर्सचे सैनिक म्हणजेच अभियंते वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पूल बांधत आहेत.
Indian Army engineers of Trishakti Corps
Indian Army engineers of Trishakti Corpsesakal

देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भीषण पूर, भूस्खलन, अचानक पूर यांसारख्या संकटे आली आहेत. दुर्गम आणि सीमावर्ती भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. अशा वेगळ्या गावांना पुन्हा एकत्र करण्यात लष्कर व्यस्त आहे. दरम्यान भारतीय सैनिकांचे कौतुक होत आहे.  

Indian Army engineers of Trishakti Corps
Mayawati Successor: मायावतींनी भाच्याला संधी देण्यामागे 'चंद्रशेखर आझाद' फॅक्टर? वाचा पुनरागमनाची इनसाईड स्टोरी!

भारतीय सेना त्रिशक्ति कॉर्प्सने सिक्कीममध्ये पूर आलेल्या नदीवर 150 फुट लांबीचा सस्पेंशन ब्रिज बांधून एक महत्त्वपूर्ण कामगिरी पूर्ण केली आहे. या पुरामुळे सीमावर्ती गावांचा संपर्क तुटला होता. नदीच्या 40 किमी प्रतिघंट्याच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यावर जवानांनी केवळ 48 तासांत हा ब्रिज उभा केला.

यामुळे आपत्तीग्रस्त गावांमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता आले. सिक्कीममध्ये या प्रकरणात त्रिशक्ति कॉर्प्सच्या अभियंत्यांनी दाखवलेला धाडस व कौशल्य यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली.

भारतीय सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉप्सर्सचे सैनिक म्हणजेच अभियंते वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पूल बांधत आहेत. आपला जीव धोक्यात घालून दोन सैनिक पूल बांधत आहेत. (Viral Video News)

खाली नदीचा प्रवाह सुमारे 40 किलोमीटर प्रति तास आहे. नदीच्या या वेगामुळे कधीही मृत्यू ओढवू शकतो. अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमानंतर 150 फूट लांबीचा झुलता पूल बांधण्यात आला आहे. यानंतर आपत्तीने तुटलेल्या गावातील लोकांना या पुलावरून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com