ISRO: भारताच्या 5 अवकाश मोहिमा, ज्यात आहे जग बदलण्याची ताकद

14 जुलै रोजी सुरू झालेल्या या मिशनने आतापर्यंत दोन टप्पे पार केले आहेत.
ISRO
ISRO sakal
Updated on

चांद्रयान-3 सह भारताने चंद्राच्या दिशेने पावले टाकली आहेत. 14 जुलै रोजी सुरू झालेल्या या मिशनने आतापर्यंत दोन टप्पे पार केले आहेत. ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे, हे अंतराळ क्षेत्रातील भारताचे बहुप्रतिक्षित मिशन होते, ज्याद्वारे देश इतिहास रचेल आणि चंद्राला स्पर्श करणारा जगातील चौथा देश बनेल. विशेष म्हणजे चांद्रयान-3 नंतर आदित्य एल-1 ते गगनयानपर्यंत अनेक अंतराळ मोहिमांवर काम सुरू आहे. विशेष म्हणजे यात जग बदलण्याची ताकद आहे.

आदित्य एल 1 (सौर मोहीम)

चांद्रयान-3 च्या यशानंतर लगेचच इस्रो आदित्य एल-1 लाँच करू शकते. ही देशातील पहिली सौर मोहीम आहे, ज्यामध्ये सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. असं म्हटलं जातंय की इस्रो 26 ऑगस्ट रोजी हे मिशन लॉन्च करू शकते. सध्या त्याचे पेलोड एकत्रीकरण आणि चाचणीचे काम वेगाने सुरू आहे. हे मिशन पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष दूर असलेल्या एल-1 कक्षेत प्रक्षेपित केले जाईल, जेथून ते 24 तास सूर्यावर लक्ष ठेवेल.

गगनयान

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांमध्ये गगनयानच्या नावाचाही समावेश आहे. हे भारताचे पहिले मानवयुक्त मिशन असेल. वास्तविक गगनयान हा तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे, ज्यामध्ये दोन मोहिमा मानवरहित असतील तर एक मोहीम मानव मिशन असेल. इस्रोच काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाठवले जातील, ज्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असतील.

शुक्र

इस्रो शुक्रयानवरही वेगाने काम करत आहे. शुक्रयान या वर्षीच प्रक्षेपित केले जाणार होते, परंतु कोविड महामारीमुळे होणारा विलंब आणि चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मिशनमुळे होणारा विलंब यामुळे आता ते 2024 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या मोहिमेला आणखी विलंब झाल्यास, इस्रो 2026 किंवा 2028 मध्ये ते प्रक्षेपित करू शकते.

कारण पृथ्वी आणि शुक्र दर 19 महिन्यांनी एकमेकांच्या जवळ येतात. भारताने 2028 पर्यंत हे केले तर शुक्रावर जाणारा जगातील पहिला देश ठरेल. अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सीने देखील व्हीनस मिशनची घोषणा केली आहे, परंतु त्यांची मोहीम 2031 पर्यंत प्रस्तावित आहे.

निसार मिशन

NISAR हे ISRO आणि NASA यांची संयुक्त मोहीम आहे. पुढील वर्षी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. हा एक उपग्रह आहे जो पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडला जाईल. हा उपग्रह अवघ्या 12 दिवसात संपूर्ण जगाचा नकाशा तयार करेल. हा उपग्रह तीन वर्षे काम करेल. निसार हा एकूण 2800 किलोचा उपग्रह आहे जो सिंथेटिक ऍपर्चर रडारवर काम करेल. इस्रो आणि नासा यांनी मिळून तो तयार केला आहे.

ExoSat मिशन

एक्सोसॅट मिशन देखील भारत लवकरच लॉन्च करणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यापूर्वी याबद्दल सांगितले होते. हे एक मिशन आहे ज्यामध्ये खगोलीय स्त्रोतांच्या गतिशीलतेचा अभ्यास केला जाईल. 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे जगातील दुसरे पोलरीमेट्री मिशन असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे मिशन ब्लॅक होल, न्यूट्रॉन तारे, आकाशगंगेचे केंद्रक आणि इतर खगोलीय घटनांबद्दल माहिती देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.