Cricket News : एकही चेंडू खेळला नाही, तरीही जिंकला समाना; क्रिकेटच्या मैदावर नेमकं घडलं तरी काय?

indonesia win the match against cambodia without  playing a single ball cricket news
indonesia win the match against cambodia without playing a single ball cricket news
Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक समान्यात आपल्याला वेगवेगळे रेकॉर्ड पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी असा सामना पाहिला आहे का ज्यामध्ये एक डावही पूर्ण झाला नाही आणि सामन्याचा निर्णय लागला देखील. इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यात झालेल्या एका सामन्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केलेल्या टीम कंबोडियाला एकही चेंडू न टाकता पराभव पत्करावा लागला आहे.

नेमकं काय झालं?

23 नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यात क्रिकेट सामना झाला. या सामन्यात कंबोडिया प्रथम फलंदाजी करत होता आणि 12 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अशी घटना घडली की सामना तिथेच संपला. इंडोनेशियाचा गोलंदाज धनेश शेट्टी 12वे षटक टाकत होता आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने कंबोडियाचा फलंदाज लुकमान बटला आऊटची अपील केली आणि अंपायरने त्याला बाद घोषित केले.

नॉन स्ट्राईकवर उपस्थित असलेल्या लुकमान बट आणि फलंदाजाला पंचाचा हा निर्णय आवडला नाही आणि त्यांनी याचा विरोध केला. पंचांनी आपल्या निर्णयावर ठाम राहीन असे सांगताच कंबोडियाचे दोन्ही फलंदाज सामना सोडून मैदानाबाहेर गेले. यानंतर कंबोडिया संघाने पुढे सामना खेळण्यास नकार दिला.

indonesia win the match against cambodia without  playing a single ball cricket news
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे होणार? शिंदे सरकार निर्णय घेण्याची शक्यता

कंबोडियाने सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर मॅच रेफरीने इंडोनेशियाला मॅचचा विजेता घोषित केले आणि अशा प्रकारे इंडोनेशियन संघ सामना न खेळता सामना जिंकला. या विजयासह इंडोनेशियाने मालिका 4-2 ने जिंकली. या T20 मालिकेतील पहिला सामना बाली येथे खेळला गेला, ज्यामध्ये इंडोनेशियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या टी-20 सामन्यातही इंडोनेशियाने 8 गडी राखून जिंकला.

indonesia win the match against cambodia without  playing a single ball cricket news
Ajit Pawar News : 'वाचाळवीरांची संख्या वाढलीय'; अजित पवारांचा रोख कोणाकडे?

त्यानंतर तिसऱ्या टी-20 सामन्यात कंबोडियाने दमदार पुनरागमन करत यजमान इंडोनेशियाचा 8 गडी राखून पराभव केला. चौथ्या T20 सामन्यात इंडोनेशियाने कंबोडियाचा 104 धावांनी पराभव करत मालिकेतील चौथा विजय नोंदवला. या मालिकेतील पाचवा सामना कंबोडियाने 7 विकेटने जिंकला आणि मालिका 3-2 अशी बरोबरीत आली. मात्र अखेरच्या टी-20 सामन्यात इंडोनेशियाने फलंदाजी न करता विजय मिळवत मालिका 4-2 अशी जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()