Viral Video: फेमस होण्यासाठी इंदौरच्या चौपाटीवर अर्धनग्न अवस्थेत फिरू लागली तरुणी; भाजप नेत्याने फटकारताच पोस्ट केला आणखी एक व्हिडिओ

Indore Girl Viral Video: तरुणी अशा अवस्थेत दिसताच लोकांनी खाणे-पिणे बंद करत या तरुणीकडे पाहू लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
Chappan Bazar Viral Video
Chappan Bazar Viral Video Esakal
Updated on

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी एका तरुणीने अश्लील व्हिडिओ काढल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्ये प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी हा प्रकार इंदौरच्या संस्कृती आणि सभ्यतेसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या तरुणीने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणावर माफी मागितली आहे.

सततच्या होणाऱ्या विरोधानंतर बुधवारी सायंकाळी तरुणीने एक व्हिडिओ जारी करून इंदौर शहरातील लोकांची माफी मागितली.

सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून मुलीने म्हटले आहे की, "मला असे वाटते की मी चुकीचे केले आहे. मी सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालायला नको होते. मी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा असे करणार नाही. माझ्या व्हिडीओमुळे जे कोणी दुखावले गेले आहेत त्यांची मी माफी मागते."

Chappan Bazar Viral Video
Laddu Mutya Swami : हाताने फॅन थांबवून प्रसाद देणारा लाडू मुत्या बाबा आहे तरी कोण?

काय आहे प्रकरण?

इंदौरच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या छप्पन मार्केटमधील या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी ही तरुणी ब्रॅलेट आणि जीन्समध्येच बाजारात फिरताना दिसली.

तरुणी अशा अवस्थेत दिसताच लोकांनी खाणे-पिणे बंद करत या तरुणीकडे पाहू लागले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी या तरुणीला फटकारले आहे.

Chappan Bazar Viral Video
iPhone Video Viral: विषय संपला! भंगारवाल्याकडे 85 हजारांचा आयफोन अन् गिफ्ट म्हणून लेकालाही दिला लाखाचा आयफोन; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.