International Chess Day: जहांगीरच्या दरबारात झालेली सर्वात मोठी बुद्धिबळ चॅम्पियनशिप, हरल्यावर राजदूताला बनवलेलं गाढव

मुघल सम्राटांमध्येही बुद्धिबळ खेळण्याची क्रेज होती. त्यासाठी मुघलांच्या काळात आंतरराष्ट्रीय सामनेही आयोजित करण्यात आले होते.
International Chess Day
International Chess Day
Updated on

असे मानले जाते की ज्या व्यक्तीला बुद्धिबळ चांगले खेळता येते त्या व्यक्तीला जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाता येते. हा खेळ माणसाला संयम, नियोजन, आत्मविश्वास आणि शिस्त शिकवतो. आज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन साजरा होत आहे.

मुघल सम्राटांमध्येही बुद्धिबळ खेळण्याची क्रेज होती. त्यासाठी मुघलांच्या काळात आंतरराष्ट्रीय सामनेही आयोजित करण्यात आले होते. तर आज आम्ही तुम्हाला जहांगीरच्या दरबारात रंगलेल्या बुद्धीबळाच्या डावाचा एक किस्सा सांगणार आहोत. यावेळी या स्पर्धेत हरल्यावर राजदूताला गाढव व्हावे लागलं होतं.

तर जाणून घेऊया जहांगीरच्या दरबारात नेमकं काय घडलं?

मुघल सम्राट जहांगीरच्या काळात बुद्धिबळ खूप खेळले जायचे. एकदा त्यांच्या दरबारामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा सामना आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत एका बाजूला जहांगीरचे खास दरबारी आणि दुसऱ्या बाजूला पर्शियाचे राजदूत होते. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, दोघांमधील हा बुद्धिबळ सामना 3 दिवस चालला. एकामागून एक युक्ती वापरली गेली आणि शेवटी पर्शियन राजदूताला पराभवाला सामोरे जावे लागले.

International Chess Day
International Chess Day 2023: बुद्धीबळाबद्दल 'या' रंजक गोष्टी माहितीय का?

जो हरेल त्याला कोर्टात गाढवासारखे फिरावे लागेल, अशी या दरबारात पैज लावण्यात आली होती. अटीनुसार असेच काहीसे घडले, पर्शियन राजदूताला पराभवाचा सामना करावा लागला, म्हणून त्याला 'गाढव' बनवून दरबारात परेड करण्यात आली.

International Chess Day
International Chess Day: बुद्धिबळ खेळल्याने सुधरू शकते स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य...

बुद्धिबळाची सुरुवात कुठे झाली?

बुद्धिबळाचा इतिहास किमान 1500 वर्षांचा आहे. या खेळाचा शोध भारतातील कन्नौज येथे झाला असे मानले जाते. मुळात याला अष्टपद म्हणजे चौसष्ट वर्ग असे म्हणतात.

International Chess Day
International Moon Day : चंद्राचा खरंच आरोग्यावर होतो का परिणाम? जाणून घ्या

संस्कृतमध्ये अष्टपदाचा वापर कोळ्यासाठी केला जातो. हे आठ पाय असलेल्या पौराणिक चेकर बोर्डवर फासेसह खेळले जात असे. आजच्या चेसबोर्डमध्ये जे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे चौकोन दिसतात ते सुमारे 1000 वर्षांपूर्वी नव्हते.

प्राचीन काळी राजा महाराज आपल्या गुलामांना हत्ती, घोडे वगैरे प्यादे बनवून बुद्धिबळ खेळत असत. कालांतराने त्याचा विस्तार पर्शियापर्यंत झाला. तेथे त्याला एक नवीन रूप आणि नाव मिळाले आणि अशा प्रकारे अष्टपद शतरंज (बुद्धिबळ) झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.