Mutual Fund मध्ये पैसा कमवायचाय मग या ट्रीक्स आणि टिप्स वाचा

गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडने कॅपिटल मार्केटमध्ये Capital Market गुंतवणूकीसाठीचं Investment एक चांगल साधन म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. मात्र म्युच्युअल फंडची असलेली प्रचंड मोठी व्याप्ती अनेकांना गोधळात टाकणारी वाटते
म्युच्यअल फंडात गुंतवणूक
म्युच्यअल फंडात गुंतवणूकEsakal
Updated on

कोरोना महामारीनंतर गेल्या दोन वर्षांपासून लोकांमध्ये गुंतवणूकीबद्दल गांभीर्य वाढू लागलं आहे. आपल्या भविष्यासाठी आणि कुटुंबासाठी गुंतवणूक Investment गरजेचं असल्याचं आता अनेकांना पटू लागलं आहे. यासाठी मग गुंतवणूकीचे वेगवेगले पर्याय विचारात घेतले जात आहेत. सुरक्षित आणि चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी प्रत्येकाला गुंतवणूक करायची असते. Investment Tips in Marathi How to Invest Money in Mutural Fund

त्यामुळेच गेल्या दोन वर्षात इक्विटी मार्केटमध्ये Equity Market गुंतवणूकदारांची संख्यादेखील वाढली आहे. यातच म्युच्युअल फंडमध्ये Mutual Fund गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र आजही असे अनेकजण आहेत. ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे नेमका कसा पैसा गुंतवावा? किती परतावा म्हणजेच फायदा होईल? हे किती विश्वासार्ह आहे? असे अनेक प्रश्न पडतात.

गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडने कॅपिटल मार्केटमध्ये Capital Market गुंतवणूकीसाठीचं Investment एक चांगल साधन म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. मात्र म्युच्युअल फंडची असलेली प्रचंड मोठी व्याप्ती अनेकांना गोधळात टाकणारी वाटते. मात्र थोडा संयम राखला तर म्युच्युअल फंडमध्येही पैसा बनवणं म्हणजे चांगला परतावा मिळवणं शक्य आहे. यासाठीच तुम्हाला आम्ही काही ट्रीक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या गुंतवणूकीचा उद्देश पूर्ण होईल आणि चांगले रिटर्नस ही मिळतील. 

तुमचं गुंतवणूकीचं उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता

कोणत्याही गुंतवणुकीसाठीची ही पहिली पायरी म्हणता येईल. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ती कोणत्या उद्देशाने करताय त्याचबरोबर ती करण्यासाठी तुम्ही किती जोखिम किंवा रिस्क घेण्यासाठी तयार आहात हे ठरवा. तुमचं गुंतवणूकीचं उद्दिष्ट ठरल्याने तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत, किती काळासाठी गुंतवायचे आहेत आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक करायची आहे हे स्पष्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर तुम्हाला तीन भागांचा विचार करावा लागेल तो म्हणजे शॉर्ट टर्म टार्गेट, मिड टर्म टार्गेट (३ ते ५ वर्ष) आणि लाँग टर्म टार्गेट (५ वर्षांहून अधिक)

हे देखिल वाचा-

म्युच्यअल फंडात गुंतवणूक
Investment Platform : सोनं, FD की शेअर बाझार, इथं पैसा गुंतवाल तर करोडपती व्हाल

म्युच्युअल फंडचा अभ्यास करा

योग्य म्युच्युअल फंड शोधणं ही त्या पुढची पायरी आहे. तुमच्या अपेक्षांची पूर्ती होईल असं आणि जिथे तुमच्या गुंतवणीकीचं उद्दीष्ट पूर्ण होईल तसचं तुमची जोखिम घेण्याची क्षमता असले यासाठी वेगवेगल्या म्युच्युअल फंडवर रिसर्च करा. यामुळे कुठे जास्त नफा मिळतोय याची देखील आपल्याला माहिती मिळते. कोणताही म्युच्युअल फंडचा प्रॉस्पेक्टस वाचा, ज्यात फंडची गुंतवणुकीची उद्दिष्ट काय आहेत, त्यांची धोरणं, किती जोखीम आहे आणि फी याविषयी माहिती असते.

योग्य म्युच्युअल फंड निवडा

म्युच्युअल फंडच्या काही पर्यायांबद्दल माहिती घेतल्यानंतर अशा म्युच्युअल फंडची निवड करा ज्यांनी दीर्घ कालावधित चांगले रिस्क एडजस्टेड रिटर्न म्हणजेच जोखिम समायोजित परतावा दिला असेल. तसचं त्यांच्याकडे अनुभवी फंड मॅनेजमेंट टीम असेल. फंड निवडतानाही तुमच्यासमोर विविध प्रकारचे पर्याय असतील ज्यात स्टॉक फंड, डेट फंड, इंडेक्स फंड आणि इंटरनॅशनल फंड अशा पर्यायांपैरी एक फंड निवडा, जो तुम्हाला अधिक योग्य वाटेल. जर तुम्ही ठरवलेली रक्कम किंवा तुमचं टार्गेट दोन वर्षात पूर्ण होणार असेल तर तुम्हाला डेब्ट फंड कॅटेगरीतील एखादा म्युच्युअल फंड निवडावा लागेल.

पोर्टफोलियोवर नजर ठेवा

म्युच्युअल फंड तुमच्या उदिष्टपूर्तीसाठी योग्य कार्य करत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवा. फंडचा परफॉर्मन्स तसचं म्युच्युअल फंड गुंतवणूकीवरील फीचा वरेवर आढावा घ्या. काही वेळेला वाईट परफॉर्मन्स असल्याचं दिसू शकतं.  मार्केटची स्थिती तसंच जर फंड मॅनेजरने चुकीच्या स्टॉक किंवा सेक्टरची निवड केल्यासं असं होवू शकतं. यासाठी संयम राखा तसचं तुमच्या कस्टमर मॅनेजरशी बोलून शंकांचं निरसन करा. 

पोर्टफोलियो रिबॅलेंस करा

तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा परफॉर्मन्स कालांतराने बदलू शकतो ज्याचा परिणाम कदाचित तुमच्या पोर्टफोलियओवर होवू शकतो. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी रीबॅलेंस केल्याने तुम्ही डायवर्सिफिकेशन योग्य तऱ्हेने करताय हे सुनिश्चित होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.