इराणमध्ये हिजाबवरून स्त्रियांचे जोरदार निदर्शने चालू असतानाच 'झोम्बी अँजेलीना जोली' या तरूणीची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. तर यानंतर तिने जगाला पहिल्यांदाच आपला खरा चेहरा दाखवला आहे. फतेमेह खिशवंद असं या तरूणीचं खरं नाव असून ती २१ वर्षाची आहे. ती इंस्टाग्रामवर भितीदायक फोटो पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध होती.
(Iran's Zombie Angelina jolie reveal her face first time)
हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोलीसारखे दिसायचे म्हणून चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि यानंतर अँजेलिनाची ‘झोम्बी’ अर्थात अँजेलिनाचे भूत म्हणून ओळखली जाणाऱ्या इराणच्या सहर तबार या २१ वर्षांच्या तरुणीने आपला खरा चेहरा जगाला दाखवला आहे. तिला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
अँजेलिना जोलीसारखे दिसण्याचा नादात सदर तरूणीने अनेक फोटो एडिट करून सोशल मीडियावर अपलोड केले. मेक-अप आणि फोटोशॉपचा वापर करत तिने हे फोटो तयार केले होते. त्यानंतर तिला भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपाखाली १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वीच तिची सुटका करण्यात आली असून एका कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान तिने आपला खरा चेहरा दाखवला आहे.
१० वर्षाची झाली होती शिक्षा
या तरूणीने सोशल मीडियावर कॅम्पेन चालवल्याने आणि तरूणांना भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिला १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती पण १४ महिन्यांच्या शिक्षेनंतर तिची सुटका करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.