VIDEO : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणाऱ्या नेत्यानं रॅलीत उडवल्या 500 रुपयाच्या नोटा; गोळा करण्यासाठी धावाधाव

डीके शिवकुमार प्रचारादरम्यान नोटा उडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
DK Shivakumar News
DK Shivakumar Newsesakal
Updated on
Summary

डीके शिवकुमार यांना कर्नाटकात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहे.

DK Shivakumar News : तुम्ही बऱ्याचदा चित्रपटांत पाहिलं असेल की, नायक रस्त्यावर पैसे फेकताना दिसतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी'मध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) कारमधून पैसे उडवताना दिसत आहे.

पण, असाच काहीसा प्रकार कर्नाटकात काँग्रेसच्या (Karnataka Congress) एका ज्येष्ठ नेत्यानं केलाय. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ते हवेत नोटा उडवताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ मंड्या जिल्ह्यातील आहे. डीके शिवकुमार प्रचारादरम्यान नोटा उडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे, आज राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तारखा जाहीर होणार असून त्याआधीच शिवकुमार यांनी नोटा उडवल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

DK Shivakumar News
PM Modi News: PM मोदींचा फोटो फाडला म्हणून काँग्रेस आमदाराला ठोठावला 99 रुपयांचा दंड

डीके शिवकुमार यांना कर्नाटकात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहे. ते पक्षाचा जोरदार प्रचार करत आहेत. शिवकुमार व्हायरल व्हिडिओमध्ये बसमध्ये उभे असल्याचं दिसून येत आहे. रॅलीत धावणाऱ्या लोकांवर ते नोटा फेकत आहेत. त्या नोटा गोळा करण्यासाठी लोक मागं धावताना दिसत आहेत.

DK Shivakumar News
Smriti Irani : 'कोर्टानं राहुल गांधींना 'या' कारणामुळं ठरवलं दोषी'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातून येतात. नुकतंच त्यांनी वोक्कालिगा समाजाला संबोधित करताना सांगितलं, तुम्ही सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटकात वोक्कालिगा समाजाची मोठी व्होट बँक आहे. जुनं म्हैसूर आणि दक्षिण कर्नाटक प्रदेशात प्रामुख्यानं वोक्कालिगा समुदायाचे लोक राहतात. अशा परिस्थितीत डीके शिवकुमार या लोकांना एकत्र करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

DK Shivakumar News
Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद

मंड्याबद्दल बोलायचं झालं तर हा जेडीएसचा बालेकिल्ला आहे. इथं विधानसभेच्या एकूण 7 जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा प्रादेशिक पक्षांनी जिंकल्या होत्या. शिवकुमार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. दोघंही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळं काँग्रेसची सत्ता आल्यास या दोघांपैकी एकाला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()