Video Viral : "हिंदुंना मारणे हा आमचा हक्क"; ऑन कॅमेरा पाकिस्तानी युवक बरळला

मी मुसलमान आहे आणि मला मुसलमानांवर जुलूम करण्याची इच्छा होणार नाही. पण समोरचा व्यक्ती हिंदू असेल तर त्याच्यावर मी जुलूम करेन
Video Viral
Video ViralSakal
Updated on

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये एक इयत्ता नववीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुस्लीम तरूणाने हिंदुंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जे गैर मुस्लीम आहेत त्यांना मारलं पाहिजे. हिंदूंना कापणे हा आमचा हक्क आहे असं वक्तव्य पाकिस्तानातील या अल्पवयीन तरूणाने केलं आहे. ऑन कॅमेरा बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कोणताही अपराधी पणाचा भाव दिसून येत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, जर तुला कुणी हिंदू व्यक्ती भेटला तर तू त्याला मारणार का? असा प्रश्न विचारल्यावर "हो मारणार" असं उत्तर सदर तरूण देताना दिसत आहे. "हिंदुस्थानचे लोकं आम्हाला घाबरतात, आमचा एकजण आणि त्यांचे १०० जण आहेत. जर एखादा हिंदू जुलूम करत असेल तर त्याला कापून टाकणे हा आमचा हक्क आहे." असं वादग्रस्त वक्तव्य तरूणाने केलं.

Video Viral
Cyrus Poonawalla : "शरद पवारांचे वय झाले, त्यांनी पंतप्रधानपदाची संधी दोनदा घालवली, आता त्यांनी थांबावे"; पवारांच्या वर्गमित्राचा सल्ला

भारतातील हिंदू हिंदूवर आत्याचार करत असतील का? असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो की, "मी मुसलमान आहे आणि मला तुमच्यावर जुलूम करण्याची इच्छा होणार नाही. पण समोरचा व्यक्ती हिंदू असेल तर त्याच्यावर मी जुलूम करेन, मला वाटलं तर मी त्याला मारेनसुद्धा. आमच्या अल्लाची ही शिकवण आहे." असं म्हणत हा तरूण भारतासोबत युद्ध आणि इतर गोष्टींवरही बोलला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, "मुस्लीम तरूणांना अशा पद्धतीची शिकवण देण्यात येते. कुराणमध्येसुद्धा गैर मुस्लिमांवर आत्याचार करण्याची किंवा मारण्याची शिकवण देण्यात येते." असा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. तर एवढ्या कमी वयात या तरूणांना इतर धर्मियांना मारण्याची शिकवण कोण देतं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()