Lab attendant watches YouTube tutorial to perform ECG: राजस्थानातील एका रूग्णालयामधील लॅब कर्मचारी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णालयातील एका लॅब कर्मचाऱ्याने रूग्णाचा इसीजी रिपोर्ट युट्यूब व्हिडीओच्या सहाय्याने काढला. जोधपुर येथील रूग्णालयात ही घटना घडली असून एका दिवसापुर्वी आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ रूग्णाच्या कुटुंबीयांकडून कॅमेरात कैद करण्यात आला आणि 'नुक्कड न्यूज' या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हिडीओ लगेचच १२०० लोकांनी पाहिला.
व्हिडीमध्ये पिवळा शर्ट परिधान केलेला हा लॅब कर्मचारी युट्यूबच्या मदतीने रूग्णाचा इसीजी रिपोर्ट काढताना पाहायला मिळत आहे. याबद्दल रूग्णच्या कुटुंबीयांनी त्याला विचारले असता तक्रार केली असता. पण, कर्मचाऱ्याने कबूल केले असता, त्याला इसीजी कशी करावी हे माहित नव्हते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमुळे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्याला इसीजी करवी लागली असे त्याने उत्तर दिले.
रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बीएस जोधा यांनी या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. बीएस जोधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनेची चौकशी सुरू आहे. शिवाय, याला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल," असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.