राज्यात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण दहा दिवस घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या गणेशाची भाक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने लोक जात आहेत.
यादरम्यान लालबागचा राजाच्या गणपती मंडळाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण प्रश्न उपस्थित करत असून अनेक नेटकऱ्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये व्हीव्हीआयपी लोकांना मोठ्या सन्मानाने दर्शन घेता येत आहे तर सामान्य नागरिकांना मात्र अपमानास्पद वागणून मिळताना दिसत आहे.