Lemon Sold: अबब! एका लिंबाची किंमत चक्क 35,000 रुपये; कुठे झालाय हा लिलाव? जाणून घ्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, शरिरातील पाण्याची आणि मिनरल्सची कमी भरून काढण्यासाठी या दिवसात लिंबूपाणी पिणं चांगलं असतं.
Lemon Sold to 35000
Lemon Sold to 35000
Updated on

नवी दिल्ली : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, शरिरातील पाण्याची आणि मिनरल्सची कमी भरून काढण्यासाठी या दिवसात लिंबूपाणी पिणं चांगलं असतं. लिंबामुळं आपल्यातील 'क' जीवनसत्वाची कमतरताही पूर्ण होते. त्यामुळंच उन्हाळ्यात लिंबाला मागणी खूप असल्यानं बाजारात ते महाग मिळतात.

पण तुम्हाला माहितीए का? की तामिळनाडूमध्ये एक लिंबू चक्क ३५,००० रुपयांना विकला गेला आहे. पण सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे इतक्या मोठ्या किंमतीला लिंबू विकत घेतलाए कोणी! (lemon sold for rs 35000 at tamilnadu temple in auction process)

तामिळनाडूमधील इरोडे जवळील सिवगिरी नावाच्या एका छोट्याशा गावातील मंदिरात हा लिंबू चक्क ३५००० रुपयांना विकला गेला आहे, मंदिर प्रशासनानं ही माहिती दिली आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात मोठ्या प्रामाणावर लिंबू आणि इतर फळे प्रसादासाठी आली होती. (Marathi Tajya Batmya)

या फळांचा लिलाव करण्याची प्रथा इथं आहे. त्यानुसार या फळांचा लिलाव करण्यात आला यामध्ये १५ भाविक सहभागी झाले होते. यांपैकी एका लिंबासाठी चक्क ३५,००० रुपयांची बोली लागली आणि तो याच किंमतीला विकलाही गेला. (Latest Marathi News)

Lemon Sold to 35000
Mission Divyastra: भारताच्या 'दिव्यास्त्र'ची यशस्वी चाचणी; PM मोदींनी ट्विट करत दिली माहिती

दरम्यान, लिलावात विकल्या गेलेल्या या लिंबाची मंदिराच्या पुजाऱ्यानं छोटीशी पूजा केली. त्यानंतर तो ज्या व्यक्तीनं लिलावात जिंकला त्या व्यक्तीला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला आहे. हा देवाचा लिंबू जिंकणाऱ्या व्यक्तीला देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची भरभराट होते तसेच त्याचं आरोग्यही चांगल राहतं, असं सांगितलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.