Lithium Reserves: राजस्थानात सापडला लिथिअमचा मोठा साठा! भारताच्या बॅटरी क्षेत्रात होणार क्रांती

भारताची ८० टक्के मागणी पूर्ण होऊ शकेल इतका हा प्रचंड साठा आहे.
Lithium Reserves in Rajasthan
Lithium Reserves in Rajasthan
Updated on

जयपूर : राजस्थानात लिथिअम खनिजाचा मोठा साठा आढळून आला आहे. यातून भारताची ८० टक्के लिथियमची मागणी पूर्ण होऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये भारतात पहिल्यांदा लिथिअमचा साठा आढळून आला होता, यापेक्षा किती तरी पटींनी मोठा साठा आता राजस्थानातील दैगाना (नागौर) इथं आढळला आहे. राजस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत वृत्त दिलं आहे. (Lithium reserves traced in Rajasthan Nagaur capacity higher than J&K reserves)

Lithium Reserves in Rajasthan
Video: मुख्यमंत्री शेती कशी करतात? अजित पवारांनी केली CM शिंदेंची मिमिक्री: Ajit Pawar

लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. GSI आणि खाण अधिकार्‍यांनी असा दावा केला आहे की, या साठ्यांमध्ये असलेले लिथियमचं प्रमाण भारताच्या एकूण मागणीपैकी 80 टक्के मागणी पूर्ण करू शकते. या साठ्याच्या शोधामुळं लिथियमसाठी चीनवरील भारताचं अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. लिथियमसाठी भारत आत्तापर्यंत चीनवर अवलंबून आहे. मात्र, राजस्थानमध्ये हा साठा सापडल्यानं चीनची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि आखाती देशांप्रमाणं राजस्थानचंसाठीही ही मोठी गोष्ट असेल, आयएएनएस या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. लिथियमसाठी भारत सध्या पूर्णपणे परदेशी पुरवठ्यावर अवलंबून असून यासाठी भारताला मोठी रक्कमही मोजावी लागते.

Lithium Reserves in Rajasthan
The Kerala Story: आता पश्चिम बंगालमध्येही 'द केरळ स्टोरी' सिनेमावर बंदी! CM ममता बॅनर्जी म्हणाल्या...

टंगस्टनचे साठे आढळले तिथंच लिथिअमही सापडलं

राजस्थानमधील लिथियमचे साठे डेगानाच्या त्याच रेनवट टेकडीमध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सापडले आहेत, जिथून एकेकाळी टंगस्टन खनिज देशाला पुरवलं जात होतं. इंग्रजांच्या राजवटीत १९१४मध्ये देगाणा येथील रेणवटच्या टेकडीवर ब्रिटिशांनी टंगस्टन खनिजाचा शोध लावला होता. स्वातंत्र्यापूर्वी, इथं उत्पादित टंगस्टनचा वापर पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्यासाठी युद्ध साहित्य तयार करण्यासाठी केला जात होता. स्वातंत्र्यानंतर देशातील ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात सर्जिकल उपकरणं बनवण्याच्या क्षेत्रातही याचा वापर करण्यात आला. त्यावेळी इथं सुमारे 1,500 लोक काम करत होते.

Lithium Reserves in Rajasthan
Diamond Fraud: 32 लाखांच्या हिऱ्यांच्या जागी दिलं गुटख्याचं पाकीट! गुजराती व्यापाऱ्याला अटक

1992-93 मध्ये चीनच्या स्वस्त निर्यात धोरणामुळं इथून बाहेर येणारं टंगस्टन महाग झालं. अखेरीस, इथं टंगस्टनचं उत्पादन थांबविण्यात आलं. सर्वकाळ वस्ती असलेला आणि वर्षानुवर्षे टंगस्टनचा पुरवठा करून देशाच्या विकासात मदत करणारा हा डोंगर एका झटक्यात ओसाड झाला आहे. त्या काळात जीएसआय आणि इतर सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांधलेली कार्यालये, घरे, उद्याने आणि अगदी शाळाही आता भग्नावस्थेत बदलल्या आहेत. आता या टेकडीतून बाहेर पडणारे लिथियम राजस्थान आणि देशाचे नशीब बदलेल, असं अधिकाऱ्यांना वाटतं.

जगातील सर्वात मऊ आणि हलका धातू

लिथियम हा जगातील सर्वात मऊ आणि हलका धातू आहे. भाजी चाकूने कापता येण्याइतका मऊ आणि पाण्यात टाकल्यावर तरंगण्याइतपत हलका हा धातू आहे. हा धातू रासायनिक ऊर्जा साठवते आणि तिचं विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते. त्यामुळं बॅटरीवर चालणाऱ्या प्रत्येक उपकरणाला लिथिअमची गरज असते. आज घरातील प्रत्येक चार्जेबल इलेक्ट्रॉनिक आणि बॅटरीवर चालणाऱ्या गॅझेटमध्ये लिथियम आहे. या कारणास्तव, जगभरात लिथियमची प्रचंड मागणी आहे. जागतिक मागणीमुळे याला पांढरं सोनं असंही म्हणतात. एक टन लिथियमचं जागतिक मूल्य सुमारे 57.36 लाख रुपये आहे.

Lithium Reserves in Rajasthan
Ajit Pawar: मंत्रालयात 3 हजार फाईल्स पडून अन् मुख्यंमत्र्यांनी साताऱ्यात तीन दिवसांत...; अजितदादांचा टोमणा

'या' देशात सर्वाधिक मोठा साठा

जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2050 सालापर्यंत लिथियम धातूची जागतिक मागणी 500 टक्क्यांनी वाढेल. या दृष्टिकोनातून, राजस्थानमध्ये लिथियमचा प्रचंड साठा मिळणे केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. 21 दशलक्ष टनांचा जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा सध्या बोलिव्हिया देशात आहे. यानंतर अर्जेंटिना, चिली आणि अमेरिकेतही मोठा साठा आहे. असे असूनही, 5.1 दशलक्ष टन लिथियमचा साठा असलेल्या चीनची जागतिक बाजारपेठेत मक्तेदारी कायम आहे.

चीनवरचं भारताचं अवलंबित्व संपणार

भारताला आपल्या एकूण लिथियम आयातीपैकी 53.76 टक्के चीनकडून खरेदी करावी लागते. 2020-21 या वर्षात भारतानं 6,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं लिथियम आयात केलं होतं आणि यांपैकी 3,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं लिथियम चीनकडून विकत घेतलं होतं. अशा परिस्थितीत राजस्थानमध्ये लिथियमचे साठे इतके आहेत की चीनची मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते आणि हरित ऊर्जेच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होऊ शकतो, असं अधिकाऱ्यांचं मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.