जेवणापुर्वी मुलीने घरात Vlog सुरू केला अन् आईने लावली कानशिलात | Video Viral

काही पालकांना आपल्या लेकराच्या कामाचं कौतुक करता येत नाही.
Vlog
Vlog Sakal
Updated on

लहान मुलांना मोबाईलचं वेड लागलं आहे, त्यांना कायम व्हिडिओ बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी मोबाईल लागतो. पण या वाईट सवयीचा त्यांच्याकडून चांगला उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये Vlog करणाऱ्या एका मुलीला तिच्या आईने कानशिलात लगावली आहे.

Vlog
NCP Crisis : अजित पवारांचे एका दगडात तीन पक्षी! काकांची भेट घेऊन कुणाचा गेम केला?

दरम्यान, ही मुलगी मोबाईलमधील सेल्फी कॅमेऱ्याने एक व्हिडिओ सुरू करते आणि म्हणते की, "Hello Guys... देखो खाना खा लो... आलू की सब्जी है और पुरी है..." यानंतर तिची आई लगेच या मुलीला कानशिलात लावते आणि म्हणते, "काय हॅलो गाईज लावलंय... त्यांनी खाल्लंय, तू खाऊन घे चूपचाप, चार तास लावलंय बोलता बोलता" असं म्हणल्यानंतर ही चिमुकली नाराज झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काही पालकांना आपल्या लेकरांचं कौतुक करता येत नाही. लहान मुलं जर एखादा नवीन प्रयोग करत असतील तर त्यांना पालकांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. जेणेकरून त्यांना अशा कामात हुरूप येईल आणि ते अजून नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित होतील. तर काही मुले असे काहीकाही प्रयोग करून पालकांना त्रास देत असतात.

पण कोणतेही काम करत असताना लहान मुलांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.