" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

X Trend: या बातमीचा मथळा वाचून तुम्हालाही प्रश्न पडाला असेल ही, Maharashtra 104 नक्की काय भानगड आहे.
Maharashtra 104 X Trend
Maharashtra 104 X TrendEsakal
Updated on

या बातमीचा मथळा वाचून तुम्हालाही प्रश्न पडाला असेल ही Maharashtra 104 नक्की काय भानगड आहे. हे दुसरे तिसरे काही नसून, एक्सवर सकाळपासून धुमाकूळ घालणारा ट्रेंड आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून एक्सवर भाजप समर्थक आणि भाजप विरोधक एकमेकांना भिडले आहेत. युजर्सच्या या वादातूनच Maharashtra 104 हा ट्रेंड सुरू झाला असून सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.

सध्या एक्सवर Maharashtra 104 हा ट्रेंड पहिल्या क्रमांकावर असून तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

एक्सवर मिस्टर सिन्हा नावाच्या एका युजरने आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट केले होते. यामध्ये त्याने भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमधील दराची आणि विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमधील दराची तुलना केली होती.

या युजरने पोस्ट केले की,

पेट्रोलचे आजचे दर

भाजपची सत्ता असलेली राज्ये

-उत्तर प्रदेश: 94.56

-गुजरात: 94.31

-उत्तराखंड : 93.48

I.N.D.I.A/काँग्रेस शासित राज्ये

-कर्नाटक: 102.84

-तेलंगणा: 107.41

-तामिळनाडू: 100.75

"भाजप सर्वसामान्यांची लूट करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप!!!" असे लिहित युजरने राहुल गांधींवर उपरोधिक टीका केली.

या युजरने ही पोस्ट करताना हुशारी दाखवत पेट्रोल-डिझेलचे दर कमी असलेल्याच भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची नावे नमूद केली.

Maharashtra 104 X Trend
"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

यावर एका युजरने प्रत्युत्तर देत पोस्ट केले की,

पेट्रोलचे आजचे दर

राजस्थान: 105.62

मध्य प्रदेश: 107.45

महाराष्ट्र: 104.88

छत्तीसगड: 101.74

बिहार: 107

हा चॅप तुम्हाला भाजपती सत्ता असलेल्या राज्यांतील पेट्रोलचे दर सांगणार नाही. याचबरोबर अन्यायकारक पेट्रोल-डिझेल दरवाढीवर कुठेही आवाज उठवणार नाही.

Maharashtra 104 X Trend
T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

दरम्यान एक्सवर या दोन्ही युजर्समधील संवाद व्हायरल झाल्यानंतर एक्सवर #Maharashtra104 हा ट्रेंड सुरू झाला आहे. आतापर्यंत #Maharashtra104 हा हॅशटॅग वापरत हजारो युजर्सनी पोस्ट करत यावर आपापले युक्तीवाद मांडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.