Maharashtra Din 2023 : अस्सल महाराष्ट्राची ओळख करून देणारी ही 9 ठिकाणं, पर्यटकांचं विशेष आकर्षण

यंदा महाराष्ट्र दिनी तुम्हीही महाराष्ट्रातील निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील ही ९ ठिकाणं बेस्ट ऑप्शन्स ठरू शकतात
Maharashtra Din 2023
Maharashtra Din 2023esakal
Updated on

Maharashtra Din 2023 : नकाशानुसार महाराष्ट्र हे भारताच्या दक्षिण मध्यात येतं. मराठमोळ्या महाराष्ट्राला अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. लाँग विकेंड जवळ येताच पर्यंटक अगदी नवनव्या ठिकाणांना भेटी देण्याच्या तयारीत दिसून येतात. यंदा महाराष्ट्र दिनी तुम्हीही महाराष्ट्रातील निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील ही ९ ठिकाणं बेस्ट ऑप्शन्स ठरू शकतात.

१. अमरावती

महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व दिशेला असलेले अमरावती देवतांचे राजा इन्द्रांचे शहर म्हणून ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि अभयारण्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. येथील देवी अंबा, भगवान श्रीकृष्ण आणि वेंकटेश्वर मंदिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील चीकलधरा आणि धरनी तहसिलमधे असलेले टायगर रिझर्व्ह एकूण 1597 स्केअर फिट परिसरात पसरलेले आहे.

२. नाशिक

नाशिकला नासहिक नावानेही ओळखले जाते. नाशिक महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागात स्थित आहे. हे शहर हिंदू धर्मियांचं प्रमुख तिर्थ क्षेत्र आहे. नाशिकमधे भरणार कुंभ मेळा पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. येथे १२ ज्योतिर्लिंगांमधील एक त्र्यंबकेश्वर मंदिरसुद्धा आहे.

३. पुणे

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. पुण्याला क्वीन ऑफ द डेक्कनच्या नावानेही ओळखलं जातं. पुण्यात शनिवारवाडा महाल आहे जे पेशव्यांचे निवासस्थान होते. प्रथम बाजीराव यांनी या महालाचा पाया उभारला होता. पुण्यात प्रसिद्ध आगाखान पॅलेससुद्धा आहे. हा महाल 1892 मधे इमाम सुल्तान मोहम्मद शाह आगाखान तृतीय बांधला होता. 1969 मधे चौथ्या आगाखानने हा महाल भारत सकारला सुपूर्द केला. (Amazing Tourist Places)

४. मुंबई

मुंबईला आधी बॉम्बे नावाने ओळखले जायचे. भारताच्या चार प्रमुख महानगरांपैकी एक असण्याबरोबरच ही महाराष्ट्राची राजधानीदेखील आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानीसुद्धा म्हटले जाते. येथे देशातील प्रमुख वित्तीय केंद्र आहे. येथे गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, जोगेश्वरी गुफा, हँगिंग गार्डन,सिद्धीविनायक मंदिर, मरीन ड्राइव्ह ही ठीकाणं पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

Maharashtra Din 2023
Maharashtra Din 2023 : 'घाटामाथ्यावरील उटी' म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एव्हरग्रीन हिल स्टेशन

५. रत्नागिरी

समुद्राने घेरलेलं आणि बाल गंगाधर टिळक यांचं जन्मस्थान असलेलं रत्नागिरी. रत्नागिरी महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पश्चिम भागातील अरबी समुद्रतटी वसलेलं आहे. हा कोकण क्षेत्राचाच एक भाग आहे. रत्नागिरीला लांबलचक समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथे हजारो छोटे स्तूप, असंख्य मूर्त्यांचे अवशेष आढळले आहेत. थीवा महाल, रत्नागिरी किल्ला ही ठिकाणं पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

६. लोणावडा

लोणावडा हे एक हिल स्टेशन आहे. याला सह्याद्री पर्वतरांगांचे मणि या नावानेही ओळखले जाते. लोणावड्याला मुंबई आणि पुण्याच्या मध्यातील प्रवेशद्वारही मानलं जातं. वुड पार्क लोणावड्याच्या मुख्य बाजारपेठाच्या अगदी मागे आहे. हे एक जैविक उद्यान आहे. या पार्कच्या विरुद्ध दिशेला एक जुनी ईसाई स्मशानभूमी आहे. जी शेकडो वर्षे जुनी आहे.

७. औरंगाबाद

औरंगाबाद जगात अजिंठा आणि एलोराच्या प्रसिद्ध बौद्ध गुहांसाठी प्रसिद्ध आहे. या गुहांना वर्ल्ड हेरिटेजमधे समाविष्ट करून घेण्यात आले होते. मध्यकाळात औरंगाबादचं भारतात महत्वपूर्ण स्थान होतं. औरंगजेबने त्याचे शेवटचे दिवस याच ठिकाणी घालवले. औरंगजेबची पत्नी रबिया दुरानीचा मकबरासुद्धा येथेच आहे.

८. दौलताबाद

हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात येतं. दौलताबाद शहरात बऱ्याच ऐतिहासिक इमारती आहेत. या इमारतींमधे जामा मस्जिद, चांद मीनार, चीनी महाल आणि दौलताबादच्या किल्ल्याचा देखील समावेश आहे.

Maharashtra Din 2023
Maharashtra Din 2024 : निसर्गाचा अलौकिक आविष्कार, महाराष्ट्रातील असं गाव जेथे 1 तास उशीरा मावळतो सूर्य

९. महाबळेश्वर

हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरचं पर्यंटन क्षेत्र पर्यटकांमधे विशेष आकर्षण आहे. येथे कृष्णाभाई मंदिर, 3 मंकी पाइंट, वेन्ना झील, लिंगमाला वॉटरफॉल, Kate's Point, विलसन पॉइंट यांसारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. महाबळेश्वरजवळच फिरण्यासाठी प्रतापगढ किल्ला देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.