Maharashtra Din : वैनगंगेच्या काठी असलेल्या या पवित्र ऐतिहासिक ठिकाणाला मार्कंडा नाव कसे पडले?

यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह किंवा मित्रमंडळींसह या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी
Maharashtra Din
Maharashtra Dinesakal
Updated on

Maharashtra Din : मार्कंडा हे वैनगंगा नदीच्या काठावर ते वसलेले गाव आहे. हे ऐतिहासिक ठिकाण महाराष्ट्रात असून यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह किंवा मित्रमंडळींसह या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी. महाराष्ट्राला या ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा लाभलाय.

या गावाला मार्कंडऋषींच्या नावावरुन मार्कंडा असे नाव पडल्याचे म्हटले जाते. उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड अशी येथील मंदिरांची स्थापत्यशैली आहे. - त्यामुळे, तेथील मंदिरांना विदर्भातील खजुराहाे म्हणून मानले जाते. - या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा, असे अनुमान काढले जाते. - येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

Maharashtra Din
Maharashtra Din

या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

वन विभागाने या परिसरात एक बाग विकसित केली आहे. तिथेही पर्यटकांना चांगला विरंगुळा मिळू शकतो. मात्र या ठिकाणी रात्रीच्यावेळेस वाहने उपलब्ध हाेत नाहीत. तेव्हा इथे शक्यतो दिवसा भेट द्या.

महाशिवरात्रीला जत्रा असते. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण, एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. (Maharashtra)

येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात.

Maharashtra Din
Maharashtra Din : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई, पण कसळसूबाई आहे तरी कोण?

मार्कंडा स्थळाचं वैशिष्ट्य

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. मार्कंडा गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. संथ वाहणारी वैनगंगा आणि तिच्या तीरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे बघता क्षणीच मनाला भुरळ पाडतात. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.

Maharashtra Din
Maharashtra Din

सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सन १९२४-१९२५ च्या सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. -

Maharashtra Din
या अमेझिंग Tourist Placesवर घालवा एप्रिल मंथचे लाँग विकेंड

येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत.

या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. याखेरीज, नंदिकेश्वर, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. - 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()