अन्यायाविरूद्ध पेटून उठा, अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणे हा मोठा गुन्हा आहे असे वाक्य आपण ऐकले असतील. जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण एकत्र येत त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे असंही आपण कित्येकदा बोलतो. पण मुक्या जनावरालाही अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा लागतो त्यावेळी त्याला न्याय मिळतो हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून आपल्याला कळेल.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा गाढवाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. तर त्यानंतर तो गाढवावार बसण्याचा प्रयत्न करतो.
मुलाने गाढवावर बसण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाढव लगेच त्याच्या पायाला चावा घेते. मुलगा ओरडू लागतो पण गाढत त्याचा पाय सोडायला तयार नसतं. पण यामुळे सदर मुलाला आपल्या कर्माची फळं मिळाली आहेत. हा व्हिडिओ पाहून "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..." हे भक्तीगीत आपल्याला आठवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.