Domino's Pizza: धक्कादायक! चक्क मागवलेल्या पिझ्झ्यामधे आढळले काचेचे तुकडे

डॉमिनोजच्या पिझ्झामध्ये चक्क आढळलेत काच
Domino's Pizza
Domino's Pizzaesakal
Updated on

Shocking News: अलीकडे तरूण मंडळींमध्ये फास्ट फुडचे विशेष क्रेज दिसून येते. मुंबईत तर वेळेअभावी अनेक जण फास्ट फुड खाऊनच त्यांचा दिवस घालवतात. पिझ्झा या फास्टफुडचं तरूणांमध्ये विशेष प्रेम दिसून येते. मात्र पिझ्झ्यामध्ये काचेचे तुकडे सापडणे हे किती धक्कादायक आहे. होय! मुंबईतील एका ग्राहकाने डॉमिनोज या प्रसिद्ध फास्ट फुड रेस्टॉरेंटमधून पिझ्झा मागवला. मात्र त्याच्यासोबत धक्कादायकच किस्सा घडला. पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे आढळून आलेत. सोशल मीडियावर त्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय.

अरूण कोल्लुरी यांनी डॉमिनोजच्या रेस्टॉरेंटमधून पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे आढळले. पिझ्झामध्ये त्याला एक नाही तर दोन ते तीन मोठे काचेचे तुकडे आढळले. संतापलेल्या या ग्राहकाने लगेच काचेच्या तुकड्यांसह पिझ्झ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यी पोस्टमध्ये त्याने 'जागो ग्राहक जागो' यांना टॅगही केलंय. या पोस्टनंतर पिझ्झा प्रेमींसह सगळ्याच युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परत एकदा या घटनेने सोशल मीडियावर डॉमिनोजबाबत मोठी खळबळ उडाली आहे.

Domino's Pizza
निष्काळजीपणाचा कळस ! Domino's मध्ये चक्क पिझ्झा बेसवर टांगलेत टॉयलेट ब्रश

या धक्कादायक घटनेने डॉमिनोजच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जर या व्यक्तीच्या खाण्यात चुकून काच गेले असते तर काय झाले असते असा संतापजनक विचारही अनेकांच्या मनात आला. ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्याने संताप व्यक्त करत मुंबई पोलिसांत या घटनेबाबत तक्रारही केली आहे. अरूण यांच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी उत्तर देत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. तसेत कायदेशीर उपाय शोधण्यापूर्वी डॉमिनोजच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा असा सल्लाही मुंबई पोलिसांनी त्याला दिलाय.

काय आहे डॉमिनोजची प्रतिक्रिया?

या खळबळजनक पोस्टवर आता डॉमिनोजचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यांच्या टीमने पिझ्झा आउटलेटही तपासले आहे. परंतु आश्चर्य म्हणजे तिथे त्यांना कोणताही दोष आढळला नाही. तसेच डॉमिनोजने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कही साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.