Viral Video: 'जमीन विकून आयफेल टॉवरसमोर रील बनवण्यासाठी गेला'; नेटकरी म्हणतात भावाला आवरा

Viral Video making a reel in front of Eiffel Tower: एक व्यक्ती फ्रान्सच्या पॅरिसमधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आयफेल टॉवर समोर रील बनवत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोक पाहात आहेत.
Eiffel Tower viral video
Eiffel Tower viral video
Updated on

नवी दिल्ली- सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती फ्रान्सच्या पॅरिसमधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आयफेल टॉवर समोर रील बनवत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोक पाहात आहेत.

अनेकांचे पॅरिसमध्ये जाऊन आयफेल टॉवर पाहण्याचं स्वप्न असतं. प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. कारण, यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. मात्र, व्हिडिओमधील व्यक्ती थेट आयफेल टॉवर पाहण्यासाठी गेला आहे अन् तिथे जाऊन रील करत आहे. रीलमध्ये तो एका पंजाबी गाण्यावर नाचत असताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.