Viral Video : झुंबा करायला जिममध्ये गेला अन् काळाचा घाला..काही कळण्याआधीच गेला जीव, पाहा व्हिडिओ

Heart Attack in Gym : मुंबईतील एका व्यावसायिकाला जिममध्ये झुंबा क्लास दरम्यान हृदयविकारचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
Gym heart attack death viral video
Gym heart attack death viral videoesakal
Updated on

Viral Video : मुंबईतील एका व्यावसायिकाला जिममध्ये झुंबा क्लास दरम्यान हृदयविकारचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. छत्रपती संभाजीनगरमधील एका फिटनेस सेंटरमध्ये कवलजीत सिंह बग्गा यांना हृदयविकार आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात बग्गा क्लास दरम्यान ब्रेक घेऊन बाजूला जातात आणि अस्वस्थ वाटत असल्याचे दिसते. त्यानंतर ते पडतात. एका वृत्तानुसार, फिटनेस सेंटरमधील लोक त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारे अनेक सेलिब्रिटींचे निधन झाले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचे जिममध्येच निधन झाले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे जिममध्ये कोलॅप्स झाल्याने रुग्णालयाच्या वाटेतच निधन झाले होते.

Gym heart attack death viral video
Trending : सहा तासांच्या ड्यूटीमध्ये तीन तास गेम, गुरुजींच्या मोबाईलची हिस्ट्री शोधल्यावर candy crush आणि काय सापडलं ?

जुलै २०२२ मध्ये टेलिव्हिजन अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले. ते 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेत मल्खानच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी सकाळी जिम केले आणि त्यानंतर बिल्डिंगच्या कंपाउंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी थांबले. त्यावेळी त्यांना हृदयविकारचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

भारतात व्यायामादरम्यान हृदयविकारचा झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रमुख डायग्नोस्टिक्स कंपनी पथकिंड लॅब्सच्या अलिकडच्या डेटानुसार, तीव्र शारीरिक हालचालीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहेत. या संशोधनानुसार, ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ज्यांच्या कुटुंबात हृदयाच्या आजाराचा इतिहास आहे, त्यांना व्यायामादरम्यान हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. तसेच, जास्त वजन असलेल्या, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही हा धोका जास्त असतो.

Gym heart attack death viral video
Trending : पहिल्यांदाच घडलं असं! कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे तीव्र व्यायामादरम्यान हृदयाची गती आणि रक्तदाब वाढणे. यामुळे हृदयावर अधिक ताण पडतो, विशेषत: जर व्यक्तीला तीव्र व्यायामाची सवय नसेल किंवा त्यांना हृदयाच्या कोणत्याही आजाराची समस्या असेल तर असे होते,असे तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.