Viral Video : सायकल चालवत असताना एक व्यक्ती पडला डोंगरावरून खाली, व्हिडिओ होतोय व्हायरल...

सध्या ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच थक्क करेल.
Viral Video
Viral Videosakal
Updated on

जगात ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्यांची कमी नाही. ॲडव्हेंचर करण्याच्या नादात जीव धोक्यात घालणारे अनेक लोक आहेत. कोणी धोकादायक डोंगरावरून उडी मारतो तर कोणी डोंगरावर सायकल चालवू लागतो. असे स्टंट पाहून घाबरून जातो, अशा परिस्थितीत असे धोकादायक स्टंट करणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल याची कल्पना करा. सध्या ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच थक्क करेल.

खरंतर, तो माणूस सायकलवरून डोंगरात फिरायला निघाला होता, पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरावरून खाली पडला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या रस्त्यावरून ती व्यक्ती सायकल चालवण्याचा प्रयत्न करत होती तो रस्ता किती खडबडीत होता. अशा स्थितीत त्याला सायकलचा तोल सांभाळता आला नाही आणि पाय घसरल्याने तो थेट डोंगरावरून खाली पडला. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, ती व्यक्ती 150 फूट खाली पडली होती.

Viral Video
दहा तास नुसतं खात राहिली २४ वर्षीय तरुणी; लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये झाला मृत्यू, पोटात जे सापडलं ते ऐकून व्हाल थक्क

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @AsmFar07 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे की, 'या व्हिडिओवरून तुम्हाला कळू शकते की ॲडव्हेंचर किती धोकादायक असू शकते.'

अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'ॲडव्हेंचर करणे सुंदर आहे, पण ते खूप धोकादायक देखील आहे', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की 'असे ॲडव्हेंचर करणे धोकादायक आहे. तुमचा जीव धोक्यात घालू नका.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com