Marathi Bhasha Gaurav Din : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी; आज पाठवा या खास मराठमोळ्या शुभेच्छा

तुमच्या संपर्कातील सर्व मंडळींना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा
Marathi Bhasha Gaurav Din
Marathi Bhasha Gaurav Dinesakal
Updated on

Marathi Bhasha Gaurav Din : मराठी ही महाराष्ट्राच्या रक्तात आहे असं म्हटलं जातं. 'मी मराठी' असे सांगताना गर्वाने छाती फुलवणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्राचा असेलच असे नाही. तर आपली मायबोली मराठी दूरवर कडेकोपऱ्यांत, महाराष्ट्राच्या सह्याद्रीत ते परप्रांतातसुद्धा मोठ्या अभिमानानं उच्चारली जाणाही भाषा. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यानिमित्तानं तुमच्या संपर्कातील सर्व मंडळींना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा.

१) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

सर्व मराठी बांधवांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

२) भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,

मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार,

वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते.

भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान

हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान

महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

३) माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

४) परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत

आमची माय मराठी

अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते

आमची माय मराठी

संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे

आमची माय मराठी

नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही

आमची माय मराठी

मराठी भाषा गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

५) आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर

प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

६) आईशिवाय कधी बाळाचे अस्तित्व असते का

मायमराठी अशीच भाषा कायम बाळगू उराशी

जगी सर्वश्रेष्ठ अशी भाषा मायमराठी!!

७) मराठमोळ्या भाषेला साखरेची चव आहे

कशाचीही उणीव नाही तर भाषेला तोड नाही

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! (Message)

Marathi Bhasha Gaurav Din
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या

८) आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर

प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मोबाईलवर या शुभेच्छा सेंड करताच नक्कीच मराठमोळं असल्याचा अभिमान नव्यानं अनुभवायला मिळालाय असं गर्वाचं फिलींग प्रत्येकाला येईल. तेव्हा या शुभेच्छा वेळ न घालवता लगेच सेंड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.