Viral Video : 'चट देनी मार देली खींच के तमाचा…'; मनोज तिवारींच्या गाण्यावर 'आप'चा जल्लोष

mcd results 2022 After bjp defeat aap workers dancing on manoj tiwari song rinkiya ke papa video goes viral
mcd results 2022 After bjp defeat aap workers dancing on manoj tiwari song rinkiya ke papa video goes viral
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय देशभरातील कार्यकर्त्यांनी साजरा केला. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करताना भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या 'रिंकिया के पापा' गाण्यावर जोरदार डान्स केला. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल बुधवारी (7 डिसेंबर) जाहीर झाले असून, त्यात आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे.

एमसीडीमध्ये 250 पैकी 134 जागा 'आप'ने जिंकल्या आहेत तर भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 9 तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीवर सत्ता गाजवणाऱ्या भाजपची आम आदमी पार्टीने हकालपट्टी केली आहे. अशा परिस्थितीत केवळ दिल्लीतच नाही तर अनेक राज्यांमध्ये आप कार्यकर्त्यांनी हा विजय साजरा केला.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

mcd results 2022 After bjp defeat aap workers dancing on manoj tiwari song rinkiya ke papa video goes viral
FIFA World Cup 2022 : कतारमध्येही CM शिंदेंचा डंका! बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फोटो होतोय व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या 'रिंकिया के पापा' या हिट गाण्यावर आप कार्यकर्त्यांनी जोरदार डान्स केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या उत्तर प्रदेश युनिटने भाजपची खिल्ली उडवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीच्या टोप्या घातलेले कार्यकर्ते 'रिंकिया के पापा'वर नाचताना दिसत आहेत आणि गाण्याचा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर प्ले होत आहे.

mcd results 2022 After bjp defeat aap workers dancing on manoj tiwari song rinkiya ke papa video goes viral
Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.