McDonalds Tomato : मॅक-डी ला टोमॅटो परवडेना! ग्राहकांची मागितली माफी; Notice Viral

McDonalds Tomato
McDonalds TomatoSakal
Updated on

जगात प्रसिद्ध असलेल्या मॅक्डोनल्ड रेस्टॉरंटच्या दिलगिरीची नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या खाद्यामध्ये टोमॅटोचा वापर कमी असल्याचं आढळल्यानंतर या रेस्टॉरंटकडून ग्राहकांची माफी मागण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीस त्यांनी रेस्टॉरंटच्या गेटवर लावली आहे.

दिल्लीतील करोल बाग येथील मॅक्डोनल्ड रेस्टॉरंटमध्ये ही नोटीस लावली असल्याचं सांगण्यात येत आहे. टोमॅचो उपलब्ध नसल्यामुळे आमच्याकडून टॉमॅटोविना उत्पादनांची सर्विस देण्यात येत होती. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं नोटीसमध्ये लिहिलं आहे.

McDonalds Tomato
Munde-Pawar : "आता तुमची बारी"; अखेर गोपीनाथ मुंडेंची शरद पवारांबाबत 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

आम्ही सर्वोत्कृष्ट घटकांसह सर्वोत्तम अन्न देण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत, आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही आम्हाला आमच्या जागतिक दर्जाच्या तपासण्यांमध्ये पुरेशा प्रमाणात टोमॅटो मिळू शकले नाहीत. त्यामुळे काही काळासाठी आम्हाला टोमॅटोशिवाय उत्पादन देण्यास भाग पाडले जात आहे. खात्री बाळगा, आम्ही टोमॅटोचा पुरवठा परत मिळवण्यासाठी काम करत आहोत. आम्ही तुमच्या संरक्षणाची कदर करतो आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो" असं या नोटीसीमध्ये लिहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.