Viral Video Momo Dough
Viral Video Momo Dough

Viral Video: मोमो प्रेमींनो सावधान! व्हिडिओ पाहून उलटीच येईल, पायांनी तुडवून बनवलं जातंय पीठ

Vendor Spotted Kneading Momo Dough With His Feet Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आला आहे. एक मोमो विक्रेता चक्क पायाने तुडवून मोमोजचे पीठ मळताना दिसत आहे.
Published on

नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांमध्ये मोमो खाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मोमोचे शॉप देखील सुरु करण्यात आले आहेत. फास्टफूट म्हणून मोमो आपली नवी ओळख तयार करत आहेत. अशात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तुम्ही जर मोमो प्रेमी असाल किंवा बाहेरचे मोमो खाण्याला प्राधान्य देत असाल तर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आला आहे. एक मोमो विक्रेता चक्क पायाने तुडवून मोमोजचे पीठ मळताना दिसत आहे. अत्यंत किळसवाणा हा व्हिडिओ आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ राजस्थानच्या जबलपूरमधील आहे. मोमोज बनवताना दिसून आलेल्या या अस्वच्छतेमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. बाहेरच्या अन्नाबाबत लोकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Viral Video Momo Dough
Mumbai Viral Video: जगातील सर्वात मोठी योद्धा 'आई', 55 वर्षीय माय कुटुंबासाठी चालवतेय रात्र-रात्र रिक्षा... तुमचेही डोळे पाणावतील
Loading content, please wait...