Video : माकडांनी केलं सिंहाच्या बछड्याला किडनॅप; बिचाऱ्या बछड्याचं तोंड पाहा

Viral Video
Viral VideoSakal
Updated on

सिंह हा जंगलाचा राजा आहे असं आपल्याला लहानपणापासून माहितीये. सिंहाच्या तुलनेत माकड हा प्राणी म्हणजे शुल्लकंच. तशी जंगलात सिंहाचीच दादागिरी चालते. पण सिंहाच्या बछड्याला माकडांनी किडनॅप केल्याचं आपण कधी ऐकलंय का? हो हे खरं आहे. माकडांनी सिंहाच्या बछड्यांना किडनॅप केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

(Monkey Kidnap Lion Baby Viral Video)

काय आहे व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक माकड सिंहाच्या बछड्याला घेऊन झाडावर उड्या मारताना दिसत आहे. तर तो बिचारा बछडा माकडाला धरून बसला आहे. त्याची हेळसांड होताना त्या व्हिडिओत दिसत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओला समर्थन केलं आहे. तर अनेकांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.