Most Expensive Insect : हा आहे जगातला सर्वात महागडा किडा, किंमत आहे लाखोंच्या घरात, पण का?

स्टॅग बिटलचे वजन २ ते ५ ग्रॅम असतं. आणि त्याचं जीवनमान तीन ते सात वर्षाचे असू शकते.
Most Expensive Insect
Most Expensive Insect esakal
Updated on

Most Expensive Insect :

जगभरात लाखो जीव, कीटक आहेत. त्यापैकी काही किडे आपल्या आसपास असतात. तर काही दाट जंगलात असतात. रोज दिसणारे किडे आपल्याला त्रास देतात. पण जगात असाही एक किडा आहे जो लाखो रुपयांच्या किमतीत विकला जातो. तो कोणता किडा अन् का तो इतका महाग आहे याबद्दल जाणून घेऊया. (Stag Beetle)

या किड्याचे नाव Stag Beetle बीटल असे आहे. आणि त्याची किंमत 75 लाख रुपये आहे. पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ अशा जातीचा हा किडा आहे. या किड्याबाबत असं म्हटलं जातं की, हा किडा जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला श्रीमंत मनापासून कोणी थांबवू शकणार नाही. (World most expensive insect stag beetle)

Most Expensive Insect
Viral Video : 'अंगारो' मॅशअपवर थिरकल्या अनुपमा आणि संजना ; अनिरुद्धची इथेही लुडबूड, व्हिडीओ झाला व्हायरल !

जीवशास्त्राच्या आधारे माहिती घेतली तर, Stag Beetle जंगलांतील इकोसिस्टीमचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे जीवशास्त्रातही या किड्याचे महत्त्व आहे.  

स्टॅग बिटलचे वजन २ ते ५ ग्रॅम असतं. आणि त्याचं जीवनमान तीन ते सात वर्षाचे असू शकते. या किड्यामध्ये मेल आणि फिमेल अशा दोन्ही जाती असतात. मेल किड्याची लांबी ३५ ते ७५ मीमी तर फीमेल किडे ३० ते ५० मिलिमीटर लांब असतात. या किड्यांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील केला जातो.

Most Expensive Insect
Trending: 'गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल' आधी रिल्सवर केली जाहीरात अन् आता म्हणते...

हा किडा उष्ण तापमानात जास्त दिवस जगू शकतो. तर थंड तापमानाबाबत ते संवेदनशील असतो. हे किडे जास्त जंगलात आढळतात. पण ते शहरी भागातील झाडांवर आढळतात.

स्टॅग बीटल गोड द्रवपदार्थ खातात. फुले, झाडाचा, फळांचा रस खाऊन ते जगतात. त्यांच्या तीक्ष्ण जबड्यांचा वापर करून तंतुमय पृष्ठभागावरील तुकडे काढतात. स्टॅग बीटल जिवंत झाडे किंवा झुडुपांना त्रास देत नाहीत.

Most Expensive Insect
Flipkart Trending : आता काय बोलावं! पेंडिग ऑर्डरसाठी तब्बल 6 वर्षानंतर फ्लिपकार्टकडून ग्राहकाला फोन; जाणून घ्या प्रकरण

जिथे कोरडे लाकूड मोठ्या प्रमाणात आहे. स्टॅग बीटल सुकलेल्या लाकडावरील आळ्याही खातात. त्यांच्या तीक्ष्ण जबड्यांचा वापर करून तंतुमय पृष्ठभागावरून स्प्लिंटर्स काढतात. ते केवळ मृत लाकूड खातात, हरिण बीटल जिवंत झाडे किंवा झुडुपे यांना धोका देत नाहीत. हे त्यांना निरोगी वनस्पतींसाठी चांगले बनवते.

इतकी महाग किंमत का आहे?

स्टॅग बीटल्सची दुर्मिळता, पर्यावरणीय महत्त्व यामुळे तो महाग आहे. त्याच्यात असलेल्या गुणधर्मांमुळे तो अतिशय महाग आहे. ज्यामुळे त्यांची बाजारात लाखोंची किंमत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.