आईपेक्षा या जगात कुणीही शक्तीशाली नाही आहे. आपल्या पोटच्या लेकरासांठी एक आई सगळ्या जगासोबत लढायची ताकद सदैव मनात ठेवतं असते. त्यामुळेच ईश्वरापेक्षाही अधिक दर्जा हा आपल्या आईला दिला जातो.अशाच एका लेकरांसाठी जिवाच रान करणाऱ्या अद्भुत शक्तीचे दर्शन नोएडाच्या रस्त्यावर झाले आहे.
चला तर मग जाणून घेऊ या, काय आहे ही घटना याविषयीची सविस्तर माहिती.
नोएडाच्या रस्त्यावर एक महिला आपल्या मुलाला आपल्या ओढणीत बांधून छातीशी घेऊन ई रिक्षा चालवतांना दिसतं आहे.
एका वर्षाच्या मुलाला छातीशी घेऊन ई रिक्षा चालवणारी आई
दिल्ली सारख्या शहरात धकाधकीच्या जिवनात लोकांना आपल्या व्यस्त जिवनमानातून इतरांकडे लक्ष द्यायला फार कमी वेळ असतो.कारण प्रत्येक जण हा आपल्या पोटापाण्यासाठी घडयाळीच्या काट्याप्रमाणे धावत असतो.पण या धकाधकीच्या जिवनात सुध्दा कुणा एका व्यक्तीचे अचानक लक्ष या लेकरांसाठी संघर्ष आईकडे जाते, 27 वर्षाच्या चंचल शर्मा या नोएडाच्या आतल्या रस्त्यावर ई रिक्षा चालवतात.
चंचल या रोज घरातील सगळख कामधंदा आवरून सकाळीच आपल्या एका वर्षाच्या मुलाला छातीशी बांधून ई रिक्षा चालवायला सज्ज होतात. चंचल या नोएडातील सेक्टर 62 नेशनल पासुन ते इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल्सच्या सेक्टर 59 लेबर चौकापर्यंत या 6.5 किलोमीटरच्या परिसरात ई रिक्षा चालवात.या परिसरात ई रिक्षा चालवणाऱ्या त्या एकमेव महिला आहे.
भारतातील हजारो महिलांप्रमाणे चंचल या सुध्दा बेरोजगारीने हतबल झाल्या होत्या. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी सहा महिण्यानंतर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केला पण तो असफल झाला. मग त्यांनी शेवटी पोटापाण्यासाठी ई रिक्षा घेऊन ती चालवण्याचा निर्णय घेतला.
चंचल सांगतात की माझ्या ई रिक्षेत बसणारा प्रत्येक जण हा माझे कौतुक करतो. तसेच मोठ्या प्रमाणात महिलां माझ्या रिक्षेत बसायला प्राधान्य देतात.10 वी पर्यंत शाळा शिकलेली चंचल ही एकल माता आहे.त्यामुळे ती तिच्या मुलाला कुणाच्या भरोशावर एकट नाही सोडु शकतं म्हणून मग ती तिच्या मुलाला सोबत घेऊन ई रिक्षा चालवते.चंंचल या दिवसाला 600 ते 700 रुपये रोज कमावतात.ज्यातील 300 रुपये हे प्राइवेट एजेंसीला द्यावे लागतातशेवटी चंचल सांगते की माझी राशन दुकान सुरु करण्याची ईच्छा होती जेणेकरून आम्ही दोघं माय लेक तिथं एका ठिकाणी बसु शकलो असतो आणि दुकानातून येणाऱ्या नफ्यातुन आमचा उदरनिर्वाह देखील झाला असता पण पैसाच्या अडचणीमुळे मला राशन दुकान टाकणं शक्य झाल नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.