Viral News: महिलेचं जडलं चोरावर प्रेम...अन् खात्यातून गायब झाले ७० लाख

काही आठवड्याची मैत्री आणि पडली चोराच्या प्रेमात
Viral News
Viral Newsesakal
Updated on

Scam: जगभऱ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमींचे आणि त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से जग जाहीर होतात. अमेरिकेच्या महिलेचा प्रेमाचा किस्सा मात्र फारच वेगळा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरूणीची एका तरूणासोबत ओळख झाली. अमेरिकेतील या तरूणीचं नायजीरियन ठगावर प्रेम जडलं. तीन मुलांची आई असलेल्या क्रिस्टिनला मात्र चोरावर जडलेलं प्रेम चांगलंच महागात पडलं. तिच्या खात्यातून तब्बल ७० लाख या चोराने गायब केलेत.

आर्टिटेक्ट इंजिनीयर असल्याचा चोराबाबत महिलेचा गैरसमज होता. सोशल मीडियावर 'मार्क गॉडफ्रे' बनून तिच्याशी बोलणारा खऱ्या आयुष्यात नायजीरियामधला एक ठग होता. त्याचं खरं नाव 'विलियम ओजो' असं होतं. विलियम ओजोने त्याच्या बहिणीचं नाव सांगत क्रिस्टिनकडून पैसे मागितले. विशेष म्हणजे प्रेमात आंधळ्या क्रिस्टिनने त्याच्या सोबत हॉलीडेही प्लान केला होता. मात्र विलियमला पैसे मिळताच त्याने क्रिस्टिनला रिप्लाय देणे बंद केले.

क्रिस्टिनजवळचे पैसे संपताच पोलिसांत तक्रारही केली. परंतु या प्रकरणावर काही तोडगा मिळेल अशी आशा पोलिसांनाही नसल्याचे त्यांनी तिला स्पष्टच सांगितले.

केवळ सहा आठवड्यांचं संभाषण आणि ठेवला आंधळा विश्वास

क्रिस्टिन आणि विलियमची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. क्रिस्टिनचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने सुरूवातीला तिला ४० रुपये मागितले आणि लगेच परतही केले. त्यानंतर त्याने बहिणीचे नाव सांगून क्रिस्टिनकडे तब्बल ७० लाखांची मागणी केली.

Viral News
Viral News: मानलं पठ्ठ्याला! २४ तासात परत मिळवला घालवलेला जॉब, नेमकं काय केलं त्याने?

तसेच एका ड्रायव्हरचा आयडी तिला पाठवत स्वत:चे नाव मार्क गॉडफ्रे असे सांगितले. क्रिस्टिनने कोणताही विचार न करता केवळ सहा आठवड्याच्या संभाषणातून त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. त्यामुळे तिला तब्बल ७० लाखांचे नुकसान भोगावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.