Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई; साचलेल्या पाण्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा आला पूर.!

Mumbai Heavy Rain : मुंबईला आज पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले.
Mumbai Heavy Rain
Mumbai Heavy Rainesakal
Updated on

Mumbai Heavy Rain : मुंबईला आज पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे, मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतल्या रेल्वेप्रवासावर झाल्याने अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये आज पहाटे १ पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत अवघ्या सहा तासांमध्ये ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. मध्य रेल्वेने दिलेल्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या तर काही रद्द करण्यात आल्या.

या परिस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संपूर्ण शहारातील तुंबलेले पाणी काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर झाला तर काही प्रवाशी अजून ही रेल्वेस्थानकांवर अडकून पडले आहेत.

तथापी, या सर्व परिस्थिती दरम्यान, सोशल मीडियावर मुंबईतल्या या जोरदार पावसाचे व्हायरल झालेले मीम्स पहायला मिळत आहेत. सोमवारी सकाळपासूनच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #MumbaiRains ट्रेंड करत आहे. कोणते आहेत हे मीम्स? चला तर मग एक नजर फिरवूयात.

Mumbai Heavy Rain
Heavy Rain : पावसाला हलक्यात घेऊ नका..! मुसळधार पावसात भिजल्यानंतर आरोग्याची ‘अशी’ घ्या काळजी

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार पाऊस आणि संभाव्य पुराचा इशारा दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे विक्रोळीच्या वीर सावरकर मार्ग, महापालिका शाळा आणि MCMCR पवई या परिसरामध्ये मागील २४ तासांत ३१५ मिमीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.