Viral Video: मुंबई लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाइन. या मुंबापूरीत कामासाठी येणारे - जाणारे लाखो लोक रोज लोकलने प्रवास करत असतात. तब्बल दोनदोन तास प्रवास करून प्रवासी आपल्या कामावर जात असतात. अर्थात या रोजच्या प्रवासात अनेक गमतीजमती घडत असतात.
कधी कुणाची भांडणं होतात, कधी कुणाला गर्दीमुळे आपल्या स्टेशनला उतरता येत नाही तर कुणाचं आणखी काही. कित्येक लोकांचं लोकल म्हणजे दुसरं घरच झालं आहे. गाणी, गप्पा, किस्से असा मजेशीर प्रवास या लोकल मधून होत असतो. पण आज याच लोकल ट्रेनचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(mumbai local train Viral Video motorman forgot to open the ac local door in nalasopara station)
सध्या काहीही झालं तर लोक ती घटना आपल्या फोन मध्ये शूट करून व्हायरल करत असतात. अशीच ही घटना आहे. तुम्ही जर लोकलने प्रवास करत असाल तर तर कधी ट्रेन उशिरा येते.. आधी तुम्ही वेळेवर असता पण त्या आधीच ट्रेन निघून गेलेली असते.. तर कधी तुम्ही ट्रेन मध्ये चढता आणि ती भलतीकडेच जाणार असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कधी त्रागा करणारे तर कधी हसवणारे अनेक किस्से या लोकल मध्ये घडत असतात. पण हा किस्सा जरा वेगळा आहे.
लांबचा प्रवास साध्या लोकलने गर्दीतून उभं राहून करण्यापेक्षा सध्या मुंबईत अनेक जर खिशाला कातर लावून एसी लोकलने प्रवास करतात. पण हाच प्रवास या प्रवाशांना महागात पडल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ जुना आहे, पण आज तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसतंय की, मोटरमनच्या केबिन बाहेर सर्वांची गर्दी झालेली दिसतेय.
तर किस्सा असा आहे की, मुंबईहून विरारला निघालेली एसी लोकल नालासोपारा स्टॉपला थांबली.. प्रवासी उतरण्याच्या तयारीत होते. पण मोटरमनने लोकलचं दारचं उघडलं नाही. मोटरमन दार उघडायला विसरला म्हणून प्रवासी नालासोपाऱ्यात उतरुच शकले नाही.
विरार मध्ये शेवटच्या स्टेशनला गाडी थांबली तेव्हा सर्व प्रवशांनी मोटरमन भोवती गराडा घालत त्याला जाब विचारला. विशेष म्हणजे मोटरमन दरवाजाच उघडायला विसरला हे त्याच्याही खूप उशिराने लक्षात आले. असा हा किस्सा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.