Latest Mumbai News: मुंबईतील नाहूर रेल्वे स्थानकावर मराठी भाषेतील संवादावरून वादाची घटना घडली आहे. अमोल माने या प्रवाशाने स्थानकावरील तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने हिंदीत बोलण्याची जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.