शिक्षण 12 वी पास, रोजची कमाई 5 कोटी; आरोपीचे अकाऊंट पाहून मुंबई पोलीस हैराण | Crime News

Crime News
Crime NewsSakal
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांनी ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीचे बँक अकाऊंट पाहून पोलिसही चक्रावले असून त्यांनी यासंबंधित अधिकची चौकशी सुरू केली आहे. सदर व्यक्ती प्रत्येक दिवशी 5 ते 10 कोटी रूपये कमावत असल्याची माहिती समोर आली असून विशेष म्हणजे या व्यक्तीचे शिक्षण फक्त 12 पर्यंत झाले आहे.

पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास राव डाडी असं या व्यक्तीचं नाव असून त्याला हैदराबाद येथील अलिशान हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने एक टीम बनवली आहे. अनेक शहरामध्ये त्याचे लोकं काम करतात. सदर टीम पुरूषांपेक्षा महिलांना टार्गेट करते आणि फसवते. महिलांना फसवून करोडोंचे अनधिकृत व्यवहार या व्यक्तीने केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

श्रीनिवास हा जरी फक्त 12 वी पर्यंत शिकला असला तरी तंत्रज्ञानामध्ये तो खूप पुढे आहे. त्याचबरोबर तो लोकांना पोलीस असल्याचं सांगत होता. त्याच्यासोबत आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन ठाण्यातून आणि दोघांना कोलकत्ता येथून ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो महिलांनी ऑनलाईन खरेदी केलेल्या पार्सलमध्ये हत्यार किंवा ड्रग्ज असल्याचं सांगत होता.त्यानंतर त्यांच्याकडून बँक अकाऊंटची माहिती घेत होता. त्यानंतर कुरिअर व्हेरिफिकेशनसाठी ग्राहकांकडून ओटीपी मागवून घेत होता. त्यानंतर ग्राहकांच्या अकाऊंटमधून पैसे ओढून घेतले जात होते.

Crime News
65 वर्षाच्या महापौराचे 16 वर्षीय शाळकरी मुलीशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूला केलं सरकारी अधिकारी | Marriage Crime

अकाऊंटमध्ये जमा झालेला सगळा पैसा सदर आरोपी चीनमधील एका व्यक्तीला पाठवत होता आणि त्याचे रूपांतर क्रिप्टोकरंसीमध्ये करत होता. पोलिसांना गंडा घालण्यासाठी सदर व्यक्ती रिअर इस्टेटचा व्यवसाय करत असल्याचं नाटक करत होता. पण पोलिसांनी अखेर त्याला अटक केली असून त्याच्या ४० बँक खात्याला सील केलं आहे. तर दीड कोटी रूपयांचा रोकडही जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.