Viral News : सध्या लग्नाचा प्रश्न हा खूपच अवघड होत चालला आहे. चांगले शिक्षण, नोकरी असूनही अनेक तरुण मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. त्यात शेतकरी नवरा नको ग बाई अशी अनेक मुलींची इच्छा असते. त्यामुळे अनेक युवक चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत असूनही लग्न जुळत नसल्याने त्रस्त आहेत.
त्यामुळेच कुही तालुक्यातील एका युवकाने चक्क उमरेड विधानसभा क्षेत्रात आजी- माजी आमदारांसह इच्छुकांनाही मुलगी पाहण्याची विनंती केली असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. (nagpur umred a boy demand to MLAs to search a girl for marriage audio call is viral)
लग्न जुळत नसले तर मित्र परिवाराला, नातेवाइकांना, जवळच्या व्यक्तींना मुलगी आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र कुही तालुक्यातील एका तरुणाने चक्क लोकप्रतिनिधींना फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे. याची आता ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झालीय. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सद्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे.
आता अशाच एक लग्नाळू तरुण मुलगी मिळत नसल्याने चक्क लोकप्रतिनिधीला फोन लावून, तुमच्या मतदारसंघात मुली पाहा अशी गळ घालताना तो दिसत आहे. सोबत पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना आपण मुलगी पाहण्यासाठी विनंती केल्याचेही सांगताना तो ऐकू येत आहे.
वेळीच लग्न न जुळणे ही मोठी सामाजिक समस्या ठरत आहे. विशेष करून शेती करणाऱ्या लग्नाळू मुलासाठी. यासाठी आता समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. नोकरी न मिळणे ही फार मोठी समस्या आहे. यामुळे कुटूंब व्यवस्था मोडकळीस निघण्याची शक्यता आहे.
सरकारने बेरोजगारीवर काही उपाय योजना केल्यास हा प्रश्न सुटू शकते. सध्या तरी सरकारचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही समस्या अधिकच जटिल झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.