नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने सांगितलेल्या चूका तुम्हीही करताय का? ज्या केसांना करतात अधिक डॅमेज

केसांची निगा राखताना कोणत्या चुका टाळायला हव्यात.
 Nita Ambani Hairstylist Says What Hair Care Mistakes You Should Avoid
Nita Ambani Hairstylist Says What Hair Care Mistakes You Should Avoid
Updated on

वयाच्या साठीतही नीता अंबानी आपल्या स्टायलिश लुकनं सर्वांना भुरळ घालत असतात. नेहमी त्यांच्या लुक्सची चर्चा होत असते. कधी साडी, कधी त्यांची ज्वेलरी तर कधी त्यांची हेअर स्टाईल. त्यांच्या प्रत्येक फ्लॉलेस लुक्समध्ये त्यांची हेअर स्टाईल महत्त्वाची भूमिका बजावते असतं. मोकले केस असो वा क्लासिक लो-बन असो त्या कोणत्याही हेअरस्टाईलमध्ये परफेक्ट दिसतात.

अनेकजण त्यांचे अनेक लुक्स फॉलो करण्याचाही प्रयत्न करतात. पण कधी कधी त्यांची हेअर स्टाईल फॉलो करताना आपल्या हातून अनेक चुका होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवर कसा होतो हे आज नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने सांगितल्या आहेत.

 Nita Ambani Hairstylist Says What Hair Care Mistakes You Should Avoid
Health Care News : पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो का? मग रिकाम्या पोटी 1 चमचा खा ही पावडर

नीता अंबानींच्या प्रत्येक हेअर स्टाईलचे श्रेय हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर याला जाते. अमितने केवळ श्रीमती अंबानींसाठीच नव्हे तर प्रियांका चोप्रापासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केले आहे.

यासोबत अमित नेहमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे केसांची काळजी कशी घ्यायची याच्यादेखील टीप्स देताना दिसतो. अशातच अमितने आपल्या हातून नकळत होणाऱ्या चुकांबद्दल सांगितलं आहे. तर त्या कोणत्या जाणून घेऊयात.

रात्री केसं धुता का?

अनेकांना रात्री केस धुण्याची सवय असते. पण तुमची हीच सवय तुमच्या केसांना नुकसान पोहचवू शकते. कारण ओले केस खूप कमकुवत असतात. अमितने नेहमी आपले केस 100% कोरडे करण्याचा सल्ला दिला. यासाठी हेअर ड्रायरचा वापर करा. पण हेअर ड्रायरचा वापर करताना त्यातून हवा गरम येणार नाही याची काळजी घ्या.

केस ओलसर असताना कोणतेही टुल्स वापरु नका

ओलसर केसांवर स्ट्रेटनरसारख्या गरम साधनांचा वापर केला तर केसांचे खुप नुकसान होते असं अमित म्हणाला आहे. जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य हवे असेल अशाप्रकारचे कोणतेही टुल्स वापरणं टाळा.

 Nita Ambani Hairstylist Says What Hair Care Mistakes You Should Avoid
Health Care News : या लोकांनी चुकूनही वर्कआउट करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिऊ नये, कारण...

रात्री झोपताना केस मोकळे सोडू नका

रात्री झोपताना केस मोकळे ठेवल्यानेही त्याचे नुकसान होते. अमित म्हणाला की, झोपताना बाजू बदलताना केस आणि उशी यांच्यात खूप घर्षण निर्माण होते. यामुळे केस तुटतात. झोपायच्या आधी केस मोकळ्या पोनी टेलमध्ये किंवा वेणी बांधण्याचा सल्ला त्यानं दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.